शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

नागपुरात मुलाच्या पुढाकाराने वडिलांचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:05 PM

Organ donation , Nagpur news ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या वडिलांच्या असह्य दु:खात मुलगा होता. त्यातही स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या व कुटुंबाच्या या संयम आणि मानवतावादी निर्णयामुळे चार रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.

ठळक मुद्देचार रुग्णांना मिळाले जीवनदान : हृदय, मूत्रपिंड, यकृत व नेत्राचे दान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :‘ब्रेन स्ट्रोक’मुळे कोमात जाऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या वडिलांच्या असह्य दु:खात मुलगा होता. त्यातही स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या व कुटुंबाच्या या संयम आणि मानवतावादी निर्णयामुळे चार रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.

दिनेश सखाराम सोनवणे, रा. सिडको, तुरकमारी, टाकळघाट त्या अवयवदात्याचे नाव. सोनवणे यांचे बुटीबोरीत फोटो स्टुडिओ व चष्म्याचे दुकान आहे. अचानक त्यांना ‘स्ट्रोक’ आल्याने बेशुद्धावस्थेत रामदासपेठेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना मंगळवारी रात्री सोनवणे यांचा मेंदूमृत झाला. याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सोनवणे कुटुंबीयांचे सांत्वन करीत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. सोनवणे यांचा २१ वर्षीय मुलगा सूयशने अवयव दानासाठी पुढाकार घेतला. सूयशची आई सारिका, बहीण मनस्वी यांनी त्या निर्णयाला दुजोरा दिला. याची माहिती, अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांना देण्यात आली. पुढील प्रक्रिया समन्वयिका वीणा वाठोरे यांनी पूर्ण केली. प्रतीक्षा यादीनुसार हृदय मुंबईचे रिलायन्स रुग्णालय, एक मूत्रपिंड सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय, दुसरे न्यू ईरा रुग्णालय तर यकृत रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. डोळे माधव नेत्रपेढीस दान करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर