शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्राला जबर मारहाण

By admin | Updated: November 15, 2015 02:17 IST

फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पाहमीतील घटना : फटाके फोडण्यावरून वादभिवापूर : फटाके फोडण्यावरून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहमी (चिचाळा) येथे गुरुवारी रात्री ७.४० वाजताच्या सुमारास घडली.ताराचंद म्हैसकर (५०), धनंजय ऊर्फ धम्मा ताराचंद म्हैसकर (२९) व समीर ताराचंद म्हैसकर या पिता-पुत्रांचा जखमींमध्ये समावेश असून, ते पाहणी (चिचाळा), ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुधाकर शंकर पिल्लेवान (४७), शीतल सुधाकर पिल्लेवान (२९) रा. पाहमी यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. समीर म्हैसकर हा पुण्याला राहात असल्याने तो दिवाळीनिमित्त गावाला आला. दरम्यान, समीरचे गावातील काही मित्र त्याला भेटण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या घरी आले होते. समीर हा त्याच्या मित्रांसह घरासमोर फटाके फोडत होता. सुधाकर पिल्लेवान याचे घर ताराचंद म्हैसकर यांच्या घरासमोर असल्याने फोडलेले फटाके सुधाकर पिल्लेवान याच्या घरासमोर उडाले. त्यातच फटाक्यांच्या आवाजामुळे सुधाकर पिल्लेवान याच्या अंगणात बांधलेल्या गाई बिथरल्या. त्यामुळे ताराचंद व सुधाकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यातच सुधाकरचा मुलगा शीतल हा हातात कुऱ्हाड घेऊन म्हैसकर कुटुंबीयांवर धावून आला. त्याने कुऱ्हाडीने वार करून ताराचंद व त्यांची दोन मुले धम्मा व समीरला जखमी केले. परिसरातील नागरिकांनी लगेच धाव घेत शीतलच्या हातची कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि ताराचंद, धम्मा व समीरला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे या तिघांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)