विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: June 9, 2015 03:26 IST2015-06-09T03:26:23+5:302015-06-09T03:26:23+5:30

मेश तुळशीराम जौंजाळकर (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पालोरा शेत शिवारात आत्महत्या केली.

Farmer's Suicide Through Poisoning | विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

आरमोरी (गडचिरोली) : येथील रमेश तुळशीराम जौंजाळकर (५५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पालोरा शेत शिवारात आत्महत्या केली.
रमेश हा कुटुंबापासून मागील दीड वर्षांपासून विभक्त राहत होता. दहा दिवसांपूर्वीच त्याने दुसरे लग्न केले व नवीन पत्नीसोबत पालोरा मार्गावर झोपडी उभारून राहत होता. सकाळी तो पत्नीला न सांगताच घरून निघाला.
पालोरा शेतशिवारात जाऊन उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी द्रव्य त्याने प्राशन केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. शेतात जाणाऱ्या नागरिकांना त्याचा मृतदेह दिसला. याबाबतची माहिती त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली. आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. रमेशच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा आहे. बँक व सावकाराचे कर्ज असल्याने त्याने आत्महत्या केली, असे कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's Suicide Through Poisoning