शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीने माखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

गुमगाव : हिंगणा-गुमगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे रस्ते विकासाची कामे सुरू आहेत मात्र दुसरीकडे ...

गुमगाव : हिंगणा-गुमगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे रस्ते विकासाची कामे सुरू आहेत मात्र दुसरीकडे स्थानिक शेतकऱ्यांचे स्वप्न हे 'धुळीने' माखले आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे मार्गालगतच्या शेतातील उभ्या पिकांवर धूळ साचली आहे. परिणामी कापूस, तूर, भाजीपाला पिकांवर उडत असलेल्या धुळीमु‌ळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेकडो एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाचाही फटका गुमगाव परिसरातील शेतकऱ्यांना बसला. परिणामी यावर्षी शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात आला आहे. सदर हिंगणा- गुमगाव मार्ग अतिशय वर्दळीचा असून हिंगणा व बुटीबोरी या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील अवजड वाहने याच मार्गाने ये-जा करतात. या मार्गाचे काम गत चार वर्षांपासून रेंगाळले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात बांधकामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा मार्गाचे बांधकाम बंद अवस्थेत आहे. सुकळी गुपचूप ते गुमगाव एफएससीच्या पतंजली गोडाऊन परिसरातून गेलेल्या बाह्यवळण मार्गापर्यंत कुठे मार्गाच्या एकाच बाजूने बांधकाम झाले आहे तर काही ठिकाणी गिट्टी, मुरूम व खोदलेल्या मातीचे ढिगारे जागोजागी दृष्टिपथास येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहने जाताच पाठीमागून धूळ उडत असते. ही धूळ मार्गालगतच्या पिकांवर जाऊन पिकांची नासाडी करीत आहे. त्यातच धुळीने माखलेला कापूस वेचणी करण्यास मजूरही धजावत नाहीत. तुरीची झाडेही जागच्या जागी सुकून जात असल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर या 'धुळधाणी 'मुळे पिकांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. धुळीमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुमगाव , कोतेवाडा, खडका, सुकळी, शिवमडका आदी गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.