शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मंचलवार दाम्पत्याविरुद्ध दोषारोपपत्र

By admin | Updated: May 23, 2015 02:53 IST

हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ठगबाज हरिभाऊ मंचलवार आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध गुन्हेशाखेने कोर्टात २९०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

कोट्यवधीची संपत्ती जप्त : गुन्हेशाखेची कारवाई नागपूर : हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या ठगबाज हरिभाऊ मंचलवार आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध गुन्हेशाखेने कोर्टात २९०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. झेंडा चौक, महाल, येथे राहणारा हरिभाऊ मंचलवार सावकारी करीत होता. सोने गहाणाचा आणि नवग्रहाचे खडे विक्रीचाही तो व्यवसाय करीत होता. संपर्कात आलेल्या व्यक्तीला तो महिन्याला २ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमेच्या ठेवी गोळा करीत होता. गोडबोल्या स्वभावाच्या मंचलवारच्या आमिषाला बळी पडून हजारो ठेवीदारांनी त्याच्याकडे कोट्यवधी रुपये ठेवले. २०११ मध्ये तो अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्याकडे ठेवी ठेवणाऱ्या हवालदिल गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. ३ जून २०११ ला हरिभाऊ आणि त्याची पत्नी मीना या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण नंतर गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आले. कोट्यवधींची संपत्ती जप्त गुन्हेशाखेत केवळ ४१७ ठेवीदारांनी तक्रारी दिल्या. त्यावरून १७ कोटी ९८, लाख, ५३ हजारांची रक्कम मंचलवार दाम्पत्याने हडपल्याचा आरोप ठेवून गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाची रोकड, १२ लाख, ५८ हजारांचे दागिने, दोन मारुती कार जप्त केल्या. विविध बँकांमध्ये असलेली त्याचे ३३ खाती होती. त्यात ८९ लाख, ८७ हजार रुपये आणि पोस्टात २ लाख, ७३ हजार रुपये गुंतवणूक आढळली. पोलिसांही सर्व खाती तसेच २७ विमा पॉलिसीही गोठवल्या. त्याच्या एकूण ११ स्थावर मालमत्ताही सील करण्यात आल्या. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश मछिंदर यांनी तपास करून हरिभाऊ तसेच मीना मंचलवार विरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)