शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांकडून वसुल केलेली अतिरिक्त रक्कम वोक्हार्ट हॉस्पिटलने परत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:57 IST

कोविड-१९ संसर्गितांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्दे मनपा आयुक्तांनी जारी केला आदेश : दोन दिवसाची दिली वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ संसर्गितांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याच्या प्रकरणात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस जारी करीत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत. यासाठी दोन दिवसाची वेळ दिली आहे. जर संबंंधित वेळेत रुग्णांची रक्कम रुग्णालय व्यवस्थापनाने परत केली नाही तर रुग्णालयाविरुद्ध महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा कायदा, बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल.आदेशात म्हटले आहे की, रुग्णालयातील ८० टक्के बेड सरकारी दरावर रुग्णांसाठी आरक्षित ठेवायचे आहेत. परंतु रुग्णालयाने याचे उल्लंघन केले. चार रुग्णांचे क्रमश: ६९,५३८ रुपये, १.५० लाख रुपये, १.५९ लाख रुपये आणि १ लाख रुपये इतकी रक्कम परत करण्यात आली नाही. याशिवाय तपासात असेही आढळून आले की १२ रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आली. त्यांनाही अतिरिक्त रक्कम परत करण्यात यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात आरक्षित व अनारक्षित बेड, सरकारी व खासगी दर यांचा उल्लेख करावा. एकूण १४ मुद्यांवर मनपा आयुक्तांनी वोक्हार्ट रुग्णालयाला उत्तर मागितले आहे.विशेष म्हणजे मनपा पथकाने ४ऑगस्ट रोजी वोक्हार्ट रुग्णालयाची पाहणी केली होती. त्या दरम्यान त्यांना अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. यावर रुग्णालय व्यवस्थापनास २४ तासात उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले होते. उत्तर समाधानकारक न मिळाल्याने मनपा आयुक्तांनी ८ ऑगस्ट रोजी रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे नवीन आदेश जारी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल