शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला कूटनीती नव्हे, निर्णयांची अपेक्षा

By admin | Updated: February 7, 2015 02:01 IST

लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो.

नागपूर : लोकहिताचे निर्णय व्हावेत या अपेक्षेने जनता नेत्यांना निवडून देते. शासकीय पातळीवर सुरू असलेल्या निरनिराळ्या कूटनीतीमध्ये जनतेला अजिबात रस नसतो. त्यांना हवे असतात विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय. त्यामुळे लोकशाही पद्धतीत वेगाने निर्णय होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘जी. एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च’तर्फे आयोजित तिसऱ्या ‘नॅशनल एचआर कॉन्क्लेव्ह’चे शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे उद्घाटन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.‘द चेंजीग डायनामिक्स आॅफ एच आर’ या विषयावर केंद्रित असलेल्या या ‘कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक हर्ष चोप्रा, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी व संचालक डॉ.रवींद्र अहेर हे प्रामुख्याने उपस्थित होते. मनुष्यामध्ये आत्मविश्वास जरूर असावा परंतु अहंकार नको. त्यामुळे माणसे दुरावतात. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक आहे. दृष्टिकोनातून मनुष्याचे व्यक्तिमत्त्व कळून येते. ‘एचआर‘चे काम म्हणजे संस्थेमध्ये समन्वय राखण्याची मोठी जबाबदारी असते. सहकार्य, संवाद आणि समन्वय जर योग्य असेल तर यश तर मिळतेच. शिवाय मनुष्यबळामध्ये उत्साहदेखील निर्माण करता येतो. तसेच संस्थेत खेळीमेळीचे वातावरण राहते, असे गडकरी म्हणाले.यावेळी हर्ष चोप्रा यांनी उपस्थितांना भारतातील उद्योगाला भरारी देण्यासाठी कसली आवश्यकता आहे यावर मार्गदर्शन केले. पंतप्रधानांची ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना उद्योगजगताच्या दृष्टीने चांगली आहे. जगातील अनेक देश उद्योगाच्या बाबतीत भारताच्या समोर आहेत. आपल्याकडे उद्योग स्थापन करण्यासाठी कायद्याची बंधने आहेत व येथे उद्योग स्थापन करणे ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विदेशातून येथे उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपाद चोप्रा यांनी केले. ‘कॉन्क्लेव्ह’चे प्रास्ताविक सुनील रायसोनी यांनी केले. राजीव खुराणा, आर.एन.पटेल. डॉ.बी.आर.सिंह, संतोष पनिक्कर, गोपाल नायर, विजय देशपांडे, विहार राखुंडे, हर्षद पै, हिरेंद्र बढिये, राजेश जैन या तज्ज्ञांनी या ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. बंगळुरू येथील उद्योजक डॉ.उषा मोहनदास यांच्या व्याख्यानाने या ‘कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. कार्यक्रमाचे संचालन संचालन शेफाली मनसाता यांनी केले. (प्रतिनिधी)