शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या विमानांसाठी ‘पार्किंग बे’चा विस्तार

By admin | Updated: April 2, 2017 02:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या आकाराच्या विमानांसाठी पार्किंग बे आणि अ‍ॅप्रॉनचा विस्तार करण्यात येणार आहे.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या आकाराच्या विमानांसाठी पार्किंग बे आणि अ‍ॅप्रॉनचा विस्तार करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळाची सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी गृह मंत्रालयाची सुरक्षा मंजुरी मिळाली आहे.(प्रतिनिधी) आधुनिकीकरणासाठी पाच कंपन्या पात्र मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) संयुक्त कंपनी आहे. यात एमएडीसी आणि एएआयचा अनुक्रमे ५१ आणि ४९ टक्के वाटा आहे. विमानतळाची सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी धोरणात्मक भागीदाराची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयएलने मे-२०१६ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन (आरएफक्यू) कागदपत्रे प्रकाशित केली होती. या प्रक्रियेत जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लि., पीएनसी इन्फ्राटेक लि., टाटा रिअ‍ॅलिटी अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., जीएमआर एअरपोर्ट लि., एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. या सहा कंपन्यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये कागदपत्रे सादर केली. प्रारंभिक छाननीत जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स, पीएनसी इन्फ्राटेक, टाटा रिअ‍ॅलिटी, जीएमआर एअरपोर्ट आणि एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. त्यानंतर या कंपन्यांची कागदपत्रे सुरक्षा परवान्यासाठी गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात आली. पीपीपी धर्तीवर विकास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बोर्ड बैठक ३१ मार्चला मुंबईत मुख्यमंत्री आणि एमएडीसी संचालक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पाचही कंपन्यांच्या सुरक्षा परवान्याला गृह मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी दिली. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, आॅपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) या मॉडेलनुसार पीपीपी धर्तीवर विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. विमानतळावर बी-७७७ आणि बी-७४७ यासारख्या मोठ्या विमानांच्या पार्किंगसाठी विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी बैठकीत एमआयएलच्या सात कोटींच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. विश्वास पाटील यांनी सांगितले की, नागपूर विमानतळावर गेल्या दोन वर्षांत प्रवासी संख्येत १८ ते २० टक्के वाढ झाली आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांत एकूण प्रवासी संख्येत दीड कोटींचा आकडा पार केला आहे. या उपलब्धीमुळे विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (एईआरए) आॅक्टोबर २०१६ मध्ये नागपूर विमानतळाला देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये मुख्य विमानतळाचा दर्जा दिला. भविष्यात कार्गोची मागणी पाहता अतिरिक्त कार्गो जागा तसेच फळे आणि भाज्यांच्या निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीमा शुल्क विभागाच्या मंजुरीनंतर हा विभाग कार्यान्वित होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.