शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ

By admin | Updated: March 3, 2016 03:01 IST

नागपूर महापालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी नागपूर महोत्सवात केली.

प्रवीण दटके : नागपूर महोत्सवात १९६५ युद्धातील वीर सैनिकांचा सत्कारनागपूर : नागपूर महापालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी नागपूर महोत्सवात केली. महोत्सवात १९६५च्या भारत-पाक युद्धातील वीर सैनिकांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात आला. माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट मिळावी यासाठी माजी सैनिकांच्या संघटनेने नागपूर महापालिकेकडे मागणी केली होती. या आधारावर महापालिकेने सभागृहात ठराव पारित करून शासनाकडे पाठविला. यासंदर्भात राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून, यासंदर्भात महापालिकास्तरावर निर्णय घ्यावा,असा अभिप्राय दिला. त्यामुळे वीर सैनिकांच्या सत्काराप्रसंगी माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा महापौरांनी केली. या निर्णयामुळे शहरातील हजारो माजी सैनिकांना लाभ मिळणार आहे. सत्कार सोहळ्याला माजी खासदार दत्ता मेघे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, परिवहन समितीचे सभापती बंडू राऊत, अप्पर आयुक्त नयना गुंडे, बाल्या बोरकर, प्रफुल्ल गुडधे, रश्मी फडणवीस, सारिका नांदूरकर, चेतना टांक, कामील अन्सारी, उपायुक्त प्रमोद भुसारी, अग्निशमन विभागप्रमुख राजेंद्र उचके, राम कोरके, विलास दवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी) या वीर सैनिकांचा झाला सत्कारकर्नल देवेंद्र मेधा, कर्नल मनोहर रामचंद्र पिंपळखुटे, ले. कर्नल बसंत हनुमंत सरदेशपांडे, कॅप्टन देवीकांत नारंजे, डॉ. वसंत तत्त्ववादी, कॅप्टन रामभाऊ घोडे, कॅप्टन शामराव भागवत, सुभेदार मेजर रामदास मकेसर, मधुकर खुजे, सुभेदार राजाराम पाठक, बलवंत बाभुळकर, रामराव बेलसरे, नायब सुभेदार दौलतराव वाघमारे, प्रकाश खरे, मनोहर गव्हाळे, लीलाधर हनवते, रामदास नायडू, सुधाकर मोरे, मंजित सिंह, शिवाजी मोहिते, नायक विजय गोविंद तट्टे, विष्णू पाटणकर, बळवंत ढोमणे, मनोहर वड्याळकर, क्रिष्णा जंगलू वाघमारे, रामा शंकर श्रीवास्तव, मन्साराम एम., हरी जांभूळकर, शंकर गावंडे, डॉ. सबीरकुमार मुखर्जी, ईश्वरसिंग बैस, वासुदेव तायवाडे, आत्माराम कांबळे, मोतीराम सुरे, के. राम केझरवानी, मधुसूदन कानडे, पी.टी. राघोर्ते, नरहर निकम, सुनील पद्दलवार, ज्ञानेश्वर मोहोड, नामदेव खंडाळकर, गोरखनाथ चहांदे, प्रभात खडक्कार, सुधाकर तापस, नरहरी अनासाने, उत्तम डकरे, गोपालसिंह कछवा, परमजित अरोरा, एम. आर. भातकुलकर, एकनाथ अंबुलकर, अशोक ढोमणे, प्रभाकर प्रांजळे, तानाजी देशमुख, जे. व्ही. दुपारे, सुधाकर बडघरे, सुधाकर कुर्वे, रामदास ढाकणे, एन. बी. साखरकर, पी. व्ही. पुराणिक, वसंत दामले, चंद्रशेखर कोवळे, रामभाऊ ढवळे, देवेंद्रसिंग ठाकूर, किशोरीलाल केशरवानी, पुरुषोत्तम भाके, के. एल. नरांजे, सुशीला माने.