शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
3
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
4
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
5
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
6
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
7
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
8
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
9
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
10
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
11
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
12
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
13
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
14
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
15
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
16
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
17
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
18
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
19
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
20
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला

मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:53 IST

Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे; मात्र जुलैनंतर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. 

गट, गणाची प्रभाग रचना, अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापतिपदाचे आरक्षण आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सदस्य पदाचेही आरक्षण काढले जाणार आहे. शिवाय मतदार यादीचा कार्यक्रमही प्रशासनाकडून राबविला जात आहे. निवडणुकीत मतदार हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते; मात्र आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने १ जुलै २०२५ पर्यंतचीच मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली. तसेच नवीन मतदारांची नोंदणीही करण्यात आली नाही. अशावेळी मोठ्या प्रमाणात नवमतदारांना पात्र असूनही, केवळ नोंदणीअभावी मतदानाच्या अधिकारापासून मुकावे लागणार आहे.

स्थानिक निवडणुकांसाठी ही मतदार यादी ग्राह्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन स्तरावर तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादीदेखील ग्राह्य धरण्यात आली. यात मात्र जुलैनंतर मतदानासाठी पात्र ठरलेल्या नवमतदारांचा निवडणूक विभागाला विसर पडला आहे.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर वाढले ७९,९८२ मतदार

विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नव्याने ७९,९८२ मतदारांची भर पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१८ वर्षे पूर्ण झालेले तरुण वंचित राहणार

पहिल्या मतदानावरून तरुणाईमध्ये मोठा उत्साह असतो. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत आहे. अशा स्थितीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण मतदारांचा १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरल्याने भ्रमनिरास झाला आहे. त्यांना मतदान प्रक्रियेपासून मुकावे लागणार आहे.

नवमतदार आहे अर्ज क्रमांक ६ नोंदणीसाठी

नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी फॉर्म ६ वापरला जातो. हा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरता येऊ शकतो. मतदार यादीत प्रथमच नाव नोंदवण्यासाठी किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झाल्यावरही हा फॉर्म वापरला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Eligible to Vote, Yet Youngsters Can't Exercise Right in Elections

Web Summary : Despite eligibility, many young voters will miss local elections due to voter list cut-off dates. The list, valid until July 2025, excludes new voters, causing disappointment. Nagpur saw 79,982 new voters after assembly elections.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024VotingमतदानnagpurनागपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग