पहिल्यांदा मामीने केला प्रतिकार तरी भाच्याचे बेडरूममध्ये घुसून अश्लील चाळे; नात्याला काळिमा फासणारी घटना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:55 IST2026-02-26T14:53:54+5:302026-02-26T14:55:16+5:30

Nagpur : नागपूरमधील यशोधानगर परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि नातेसंबंधाची मर्यादा ओलांडणाऱ्या घटनाग्रस्त प्रकाराची माहिती समोर आली आहे.

Even though the aunt resisted at first, he entered the aunt's bedroom and forced her; An incident that tarnished the relationship was revealed | पहिल्यांदा मामीने केला प्रतिकार तरी भाच्याचे बेडरूममध्ये घुसून अश्लील चाळे; नात्याला काळिमा फासणारी घटना उघड

Even though the aunt resisted at first, he entered the aunt's bedroom and forced her; An incident that tarnished the relationship was revealed

नागपूर : नागपूरमधील यशोधानगर परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि नातेसंबंधाची मर्यादा ओलांडणाऱ्या घटनाग्रस्त प्रकाराची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ३० वर्षीय भाच्याने आपल्या ३२ वर्षीय सख्ख्या मामीवर विनयभंग आणि अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे. 

घटनेची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली, जेव्हा पीडित महिला आपल्या घरात बेडरूममध्ये कपाटातून कपडे काढत होती. यावेळी तिचा भाचा त्याच खोलीत बेडवर लोळत होता. जेव्हा महिला बेडरूममधून आपले काम करून निघत होती तेव्हा त्यांच्या भाच्याने मागून येऊन त्यांना पकडले. महिलेने त्याला विरोध केला, पण आरोपीने कोणतेही स्पष्टीकरण न देता बेडरुममधून निघून गेला. 

हि घटना घडल्यानंतर काही दिवसांनीच दुसरी घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली, जेव्हा महिला घरात एकटी होती. आरोपी परत बेडरुममध्ये प्रवेश करून मागून तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील चाळे करणे सुरू केले. महिलेने त्याला धक्का देत देत जोरदार प्रतिकार केला आणि त्वरित घराबाहेर धाव घेऊन आपली सुटका केली. 

पीडितेने पोलिसात तक्रार नोंदविल्यापासून नागपूर पोलिसांनी आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेखला ताब्यात घेतले असून त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली असून स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. 

Web Title : विरोध के बावजूद भतीजे ने मामी के साथ की अश्लील हरकतें; रिश्ता कलंकित।

Web Summary : नागपुर: एक 30 वर्षीय भतीजे पर अपनी 32 वर्षीय मामी के साथ छेड़छाड़ करने का आरोप है। आरोपी ने विरोध के बावजूद बार-बार उसके बेडरूम में प्रवेश किया और अश्लील हरकतें कीं। पुलिस ने आरोपी मोहम्मद अल्तमश सलीम शेख को गिरफ्तार कर कानूनी कार्रवाई शुरू कर दी है। घटना से व्यापक आक्रोश है।

Web Title : Nephew's obscene acts with aunt despite resistance; relationship tarnished.

Web Summary : Nagpur: A 30-year-old nephew allegedly molested his 32-year-old aunt. The accused repeatedly entered her bedroom, despite her resistance, and committed indecent acts. Police arrested the accused, Mohammad Altamash Salim Sheikh, and are pursuing legal action. The incident has caused widespread outrage.