शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतरही लोकप्रतिनिधी लोकांशी जुळलेला असावा

By admin | Updated: October 12, 2014 01:19 IST

निवडणुकीत सरकार बनते अन् बदलते. तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत व्यक्ती महत्त्वाची असते. उमेदवार असा असावा की जो निवडून आल्यानंतरही जनतेशी जुळून राहील,

राष्ट्रीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांचे मत नागपूर : निवडणुकीत सरकार बनते अन् बदलते. तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत व्यक्ती महत्त्वाची असते. उमेदवार असा असावा की जो निवडून आल्यानंतरही जनतेशी जुळून राहील, जनतेला तो आपलासा वाटेल. अनिस अहमद हे असेच व्यक्तिमत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष व खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.रजवाडा पॅलेस येथे मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार माजी मंत्री अनिस अहमद यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खा. दर्डा बोलत होते. या वेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री ए. पल्लमराजू, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रिता बहुगुणा जोशी, मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजकुमार पटेल, अ.भा. समितीच्या अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष खुर्शीद अहमद, सलीम अहमद, सकल जैन समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल पारेख आदी उपस्थित होते. या वेळी खा. दर्डा पुढे म्हणाले, अल्पसंख्यंक मंत्री असताना अनिस अहमद यांनी जैन समाजाला अल्पसंख्यकांचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यासाठी प्रयत्न केले. जैन समाजाला अल्पसंख्यक दर्जा दिल्याबद्दल त्यांनी अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी केंद्रीय मंत्री आदित्य जैन यांचे आभार मानले. अनिस अहमद म्हणाले, जैन समाजाने सदैव चांगली कामे केली आहेत. या समाजाने नेहमी काँग्रेसला साथ दिली आहे. एलबीटीला आम्ही विरोध केला असल्याचे सांगत त्यांनी एलबीटीवर नाराजी व्यक्त केली. एलबीटी रद्द करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पारित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अतुल कोटेचा यांनी संचालनासह आभार मानले. (प्रतिनिधी)नागपूरवर लक्षउत्तर प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष रिता बहुगुणा जोशी म्हणाल्या, नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे. येथे काही अशी महत्त्वाची ठिकाणे व कार्यालये आहेत की ज्यामुळे जगाचे लक्ष नागपूरकडे आकर्षित होते. अनिस अहमद हे धर्मनिरपेक्ष आहेत. या निवडणुकीत नागपूरकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा दौरा नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे, अशी टीका करीत मोदी यांनी ‘रॉक स्टार’ची पदवी मिळविण्याशिवाय काय केले, असा सवाल त्यांनी केला. भाजपची ही अशी पहिली निवडणूक आहे की ज्यात त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही व मुख्यमंत्रिपदाचा चेहराही निश्चित झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.