शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
3
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
4
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
5
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
6
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
7
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
8
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
9
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
10
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
11
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
12
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
13
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
14
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
15
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
16
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
17
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
18
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
19
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मोकळी मैदाने संकटात अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: May 19, 2014 00:49 IST

शहरात जमिनीच्या किमती गगनाला भिडत असताना, नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासद्वारे आरक्षित केलेले मैदान अतिक्रमणाच्या कचाट्यात सापडले आहे. खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या

न्यायालयाने घेतली दखल

नागपूर : शहरात जमिनीच्या किमती गगनाला भिडत असताना, नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासद्वारे आरक्षित केलेले मैदान अतिक्रमणाच्या कचाट्यात सापडले आहे. खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या मनपाच्या ४० मैदानापैकी केवळ १६ मैदानांचा खेळण्याकरिता उपयोग होत आहे. अन्य मैदानावर अतिक्रमण झाले आहे. मनपाने खेळण्याबरोबरच विविध सार्वजनिक कामासाठी जागा आरक्षित केल्या आहेत. अशा अनक जागा मनपाच्या नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनासुद्धा माहीत नाही आणि अधिकारी जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत नाही. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील खेळाची मैदाने नाहिशी होत असल्यासंदर्भात याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने मनपाचा नगररचना विभाग व नासुप्रच्या अधिकार्‍यांकडून शहरातील मैदानाची माहिती मागितली होती. मनपाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकू ण १६३ जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यापैकी ४० मैदाने मनपाच्या अधिकार क्षेत्राखाली येतात. यातील केवळ १६ मैदानांचा खेळण्याकरिता उपयोग करण्यात येत आहे. ४ मैदाने गुंठेवारी कायद्यांतर्गत आली आहेत, तर गोसावी घाट, पीडब्ल्यूडी कार्यालय, झोपडपट्टी व खासगी लॉनने प्रत्येकी एकेक मैदान व्यापले असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केले. नासुप्रनेही खेळाच्या मैदानासाठी १६३ जागा आरक्षित असल्याचा खुलासा केला आहे. राज्य शासनाने यातून ११ स्थळे क्रीडांगणाच्या आरक्षणातून वगळली आहेत. २ स्थळांचा मिहान क्षेत्रात समावेश झाला आहे. सध्या नासुप्रकडे ६१ मैदाने उपलब्ध करून यापैकी २ मैदाने विकसित करण्यात येत आहे. खेळण्याबरोबर इतर उपक्रमासाठीही मनपा, नासुप्रने जमिनी आरक्षित केल्या आहे. मात्र त्याचा उपयोग होत नसल्याने, या मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. (प्रतिनिधी) यासाठी केल्या जमिनी आरक्षित मार्केट, रुग्णालय, समाजभवन, घाट, शाळा, खेळाचे मैदान, पोलीस स्टेशन, फायर स्टेशन, बस स्टेशन, रेल्वे, पार्किंग, डम्पिंग यार्ड, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टॉटर हाऊस, एमएसईबी नगररचना कार्यालयात भूमाफियांचे वर्चस्व सिव्हिल लाईन येथे मनपाची भव्य इमारत आहे. या इमारतीतील अनेक गाळे रिकामे पडले आहेत. असे असतानाही मनपाचा नगररचना विभाग नारंग टॉवर या स्कीममध्ये आहे. या कार्यालयाचा फेरफटका मारला असता, येथे भूमाफियांचे वर्चस्व दिसून आले. साहेबांच्या केबिनपासून अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कक्षात यांचे वर्चस्व दिसले. या कार्यालयाच्या अधिकार्‍यांना फक्त खेळासाठी आरक्षित करण्यात आलेल्या मैदानाची माहिती मागितली असता, अधिकार्‍यांकडे ती नव्हती. कुठल्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, याची विचारणा केली असता, ठळक एक-दोन जागाच त्यांनी सांगितल्या. आणखी कुठल्या उपक्रमासाठी जमिनी आरक्षित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र किती जागा आरक्षित केली आहे, त्याचे सध्याचे स्टेटस् काय आहे, याची माहिती त्यांच्याकडे नव्हती.