शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

जादा दंडाच्या कारवाईवरच जोर

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून

नागपूर : भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून यात ३७३ जणांचा मृत्यू तर १५१३ जण जखमी झाले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. असे असतानाही वाहतुकीचे नियम सांगणारे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हतबल झाले आहे. शासनाकडून दिलेले टार्गेट (लक्ष्य) पूर्ण करण्यासाठी नियमांच्या पूर्ततेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी जादा दंडाच्या कारवाईवरच जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे. मात्र, आरटीओचे वायू पथक क्वचितच शहरात दिसून येते. अनेकांचा जोर आवडीच्या सीमा तपासणी नाक्यांवरच असतो. आरटीओ, ग्रामीणअंतर्गत महत्त्वाचे चार नाके येतात. यात भंडारा मार्गावरील साकोलीपुढे देवरी येथे सीमा तपासणी नाका आहे. या नाक्यावर एका पाळीत ५०० ते ६०० ट्रक्स येतात. जबलपूर मार्गावर देवलापारच्या पुढे मानेगावटेक येथील सीमा तपासणी नाक्यावर २०० ते ४०० ट्रक्स, पांढुर्णा मार्गावरील उमरी नाक्यावर सुमारे ३००च्यावर ट्रक्स तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील देवाडा नाक्यावर ३०० च्यावर ट्रक्स येतात. या नाक्यांवर तीन पाळीत तपासणीचे काम सुरू असते. मोटार वाहन कायद्यातील कलम १९४ नुसार वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेला जात असेल तर प्रत्येक टनामागे सुमारे ४ हजार ५०० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. मात्र वाहतूकदारांमध्ये हा दंड बुडविण्याची प्रवृत्ती अधिक असते. याचा फायदा निरीक्षक घेत असल्याने दिवसभरात हजारो रुपयांची माया जमा होते. शिवाय आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत मोठा महसूलही गोळा होतो. यामुळेच नाक्यांवर काम करण्यासाठी निरीक्षकांमध्ये चढाओढ लागते.
या वर्षी नागपूर शहर आरटीओ कार्यालयाला विविध कामाचे लक्ष्य दिले होते, परंतु जादा दंडाचे लक्ष्य सोडल्यास इतरमध्ये ५० टक्केही लक्ष्य पूर्ण झालेले नाही. हेल्मेटवरील कारवाईत तर आतापर्यंत शून्य लक्ष्य आहे. अतिक्षमता प्रवासी रहदारीसाठी ३६५ प्रकरणांचे लक्ष्य दिले असताना फक्त ६९ लक्ष्य पूर्ण झाले आहे. सस्पेन्शन आॅफ परमिटची फक्त एक कारवाई तर वाहनाच्या छतावर सामान घेऊन जाणाऱ्या केवळ तीन वाहनांवर कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)