शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित

By admin | Updated: March 16, 2015 02:30 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे.

नागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. परंतु या योजनेचे कार्यालय सहा ते आठ तासांसाठी उघडे राहत असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेष म्हणजे, रात्री-बेरात्री लाभार्थी असलेल्या गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला याचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गोरगरीब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली ही योजना नागपूर जिल्ह्यात तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. खासगी इस्पितळांत या योजनेतील आरोग्य मित्रांची वेळ ठराविक आहे. सकाळी ९ वाजता सुरू होणारे हे केंद्र सायंकाळी ५ वाजताच बंद होते. या वेळेत योजनेतील लाभार्थी आलाच तरच त्याला याचा लाभ मिळतो, अन्यथा त्याला पदरमोड करून उपचार घ्यावा लागतो किंवा दुसऱ्या दिवसाची वाट पहावी लागते. सूत्राने दिलेल्या महितीनुसार, एका इस्पितळात रात्री हृदयविकाराचा एक रुग्ण भरती झाला. त्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. रुग्णाचे नातेवाईक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया करण्याची विनंती करीत होते. परंतु डॉक्टर केंद्र बंद झाल्याचे कारण देत होते. पैसा जमा करा किंवा मेडिकलमध्ये न्या, असा सांगितले जात होते. अखेर रुग्णाच्या नातेवाईकांनी पैशांची जमवाजमव करून तिथेच उपचार घेतला. रुग्णाचा जीव वाचला तरी कर्जात अडकला. असेच प्रकार इतरही इस्पितळात होत असल्याच्या तक्रारी आहेत.नियमानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेत इमरजन्सी रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी केंद्र सुरू असण्याची गरज नाही. योजनेत समाविष्ट इस्पितळांना ‘इआयटी’ (इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन) नंबर दिले आहेत. डॉक्टरांना या दूरध्वनीवरून फक्त माहिती देऊन लाभार्थ्यांवर उपचार सुरू करायचे असतात, तर रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक दस्तावेज ७२ तासांत इस्पितळे जमा करायचे असतात. परंतु काही खासगी इस्पितळे पैशाचा मोहापायी आणि कटकट कोण लावून घेणार यासाठी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)