शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 2:55 AM

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला दणका

- राकेश घानोडे नागपूर : स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी भरपाईसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी दिला आहे.रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणे हा फौजदारी गुन्हा नाही. त्यामुळे जखमी प्रवाशाला भरपाई नाकारली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले. चुकीमुळे होणारा अपघात व स्वत: करवून घेतलेला अपघात यातील फरकही निर्णयात स्पष्ट करण्यात आला. प्रवाशाने स्वत:हून अपघात करवून घेतला हे तेव्हाच म्हणता येते, जेव्हा त्याचा तसा उद्देश असतो. हा उद्देश सिद्ध झाल्यानंतर मात्र, प्रवाशाला रेल्वे कायद्याच्या कलम १२४-ए अंतर्गत भरपाई दिली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले.२५ मे २०१४ रोजी नागपूर येथील रेखा सूर्यवंशी या पतीसह रेल्वेने इतवारी येथून तुमसरला जात होत्या. गर्दीमुळे त्यांनी फलाटाऐवजी रुळाच्या बाजूने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रेल्वे चालायला लागली आणि रेखा या रेल्वेत चढताना खाली कोसळल्या व त्यांचे दोन्ही पाय रेल्वेच्या चाकाखाली येऊन धडावेगळे झाले. त्यानंतर त्यांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणात भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. रेखा यांनी स्वत:हून अपघात करवून घेतल्यामुळे त्यांना भरपाई दिली जाऊ शकत नाही हा रेल्वेचा बचाव न्यायाधिकरणाने मान्य करुन याचिका फेटाळली होती.चार लाख नुकसानभरपाईउच्च न्यायालयाने रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द करून रेखा यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम रेखा यांना चार महिन्यात अदा करण्याचा आदेश रेल्वेला देण्यात आला. तसेच, या आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास या रकमेवर आदेशाच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत ७.५ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात