शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवृत्ती वेतनधारकांचा सरकारविरुद्ध एल्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:23 IST

देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देईपीएफओ समोर हजारोंचे आंदोलन : ९००० पेन्शन, महागाई भत्त्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले. समितीच्या माध्यमातून भर दुपारी हजारो पेन्शनर्सनी ईपीएफओ आणि सरकारविरु द्ध घोषणाबाजी करीत निषेध केला.समितीच्या आंदोलनात नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरातून जवळपास तीन हजार निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. समितीचे महासचिव प्रकाश पाठक यांनी सांगितले, सद्यस्थितीत असंघटित क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे पेन्शन अत्यल्प आहे. त्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी वेतन दिले जाते. समितीच्या माध्यमातून १९९५ पासून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले जात आहे. मात्र २५ वर्षे लोटूनही निवृत्ती वेतनधारकांना न्याय मिळाला नाही. १९९५ मध्ये निवृत्ती वेतन योजनेत कायद्यानुसार दुरुस्ती करण्यासाठी राज्यसभेत मागणी करण्यात आली होती व त्यानुसार तत्कालीन सरकारने भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली. या समितीने २०१३ साली आपला अहवाल सरकारकडे सादर केला व निवृत्तांच्या हक्कासाठीच्या शिफारशी केल्या. यानुसार अंमलबजावणी झाली तर १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रातील १७ कोटी कामगार व त्यांच्यावर निर्भर असलेल्या कुटुंबातील ६५ कोटी लोकांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. कोशियारी समितीच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयानेही असंघटित क्षेत्रातील निवृत्ती वेतन धारकांसाठी योग्य तरतूद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत चालढकलपणा चालविला असल्याचा आरोप पाठक यांनी केला.नुकतेच हैदराबाद येथे सीबीटीच्या सभेत मागणीनुसार निवृत्ती वेतन बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. या मागणीचे निवेदन ईपीएफओचे विभागीय आयुक्त (१) विकास कुमार यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, सचिव प्रकाश दामले, श्याम देशमुख, कोषाध्यक्ष अरुण कारमोरे, दादा तुकाराम झोडे, भीमराव ढोले, मधुकर वनकर, पुंडलिक मुनेश्वर, सूर्यनारायण बत्तुलवार, मोरेश्वर कुकडे, संभाजी त्रिभुवन आदींचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधी