नागपुरात अकरावीच्या जागा वाढल्या : २७ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:53 IST2020-08-01T23:51:44+5:302020-08-01T23:53:14+5:30
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही.

नागपुरात अकरावीच्या जागा वाढल्या : २७ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कला शाखेत २०० जागा वाढल्या आहेत तर वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रत्येकी ४० जागांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने नुकताच एका नवीन ज्युनिअर कॉलेजला मंजुरी दिल्याने कला शाखेच्या जागेत वाढ झाली आहे. तर शहरातील एका महाविद्यालयाने वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागा वाढवून मागितल्या होत्या. त्याला मंजुरी दिली आहे. या वाढलेल्या जागा केंद्रीय प्रवेश समितीने सहभागी करून घेतल्या आहेत. समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवेश प्रक्रियेंतर्गत शनिवारी २७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अजूनपर्यंत भाग-२ फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. समितीने सांगितल्याप्रमाणे पुण्यातून अजूनही पूर्ण कार्यक्रम आलेले नाहीत.
जागांची स्थिती
शाखा प्रक्रियेपूर्वीच्या जागा प्रक्रियेनंतरच्या जागा
कला ९४६० ९६६०
कॉमर्स १७८८० १७९२०
विज्ञान २७२९० २७३३०
एमसीव्हीसी ४१३० ४१३०