नियंत्रित राहणार विजेचे दर

By Admin | Updated: May 7, 2015 02:11 IST2015-05-07T02:11:12+5:302015-05-07T02:11:12+5:30

विजेच्या किमती नियंत्रणात राहणार. नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार नाही, असा दावा विजेचे दर वाढविण्यासाठी ...

Electricity rates will remain constant | नियंत्रित राहणार विजेचे दर

नियंत्रित राहणार विजेचे दर

नागपूर : विजेच्या किमती नियंत्रणात राहणार. नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार नाही, असा दावा विजेचे दर वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नियामक आयोगासमोर याचिका दाखल करणारे महावितरणचे प्रबंध संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी बुधवारी केला.
आढावा बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, महावितरणच्या एकूण खर्चाच्या ८८ टक्के खर्च केवळ वीज खरेदीवर होतो. हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शासकीय कंपनी महाजेनकोच्या महाग विजेच्या ऐवजी पॉवर एक्सजेंचजी स्वत: वीज खरेदी करण्याच्या विकल्पावरही विचार केला जात आहे. महाजेनकोनेसुद्धा उत्पादन अधिक येत असलेल्या आपल्या युनिटला बंद करण्याची योजना तयार केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने वीज दर वृद्धी याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांसह खर्च कमी करण्याच्या उपायांनासुद्धा आपल्या याचिकेत समाविष्ट केले आहे. यामुळे खर्चात कमतरता आली आहे. परंतु कमी झालेला आकडा सांगण्यास मात्र त्यांनी नकार देत यामुळे विजेच्या दरांना नियंत्रित ठेवण्यात यश मिळेल, असे स्पष्ट केले. यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्याच्या निलंबनाचा निर्णय अगदी योग्य असून चूक करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कंपनी वाचविणार नाही. अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही. श्रमिक संघटनांनीसुद्धा आंदोलनापूर्वी विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कंपनीचे संचालक (परियोजना) पी.यू शिंदे, मुख्य अभियंता मोहन झोडे, प्रसाद रेशमे, संजय ताकसांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity rates will remain constant