शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By admin | Updated: April 4, 2016 05:49 IST

विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २१ या कार्यकाळासाठी निर्वाचित अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या २०१६ ते २१ या कार्यकाळासाठी निर्वाचित अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची आणि समिती प्रमुखांची आज निवड करण्यात आली. यात प्रत्येक सदस्यालाच संतुष्ट करण्याचा प्रयत्न म्हैसाळकरांनी केला आहे. महामंडळावर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. इंद्रजित ओरके यांची निवड करण्यात आली. तर विदर्भ साहित्य संघाच्या सरचिटणीसपदी विलास मानेकर आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ. जोशी, वामन तेलंग आणि डॉ. राजन जयस्वाल यांची निवड करण्यात आली. ही घोषणा बैठकीनंतर मनोहर म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. महामंडळावर कोणत्या सदस्यांची निवड करण्यात येणार म्हणून चांगलीच चर्चा रंगली होती. महामंडळावर जाण्यासाठी अनेक नावे शर्यतीत होती पण त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे महामंडळावर निवड झालेल्या सदस्यांचे चेहरे फुलले होते तर ज्यांची निवड करण्यात आली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हतबलताही होती. त्यात डॉ. जोशी यांनी महामंडळाला चांगलेच लांबलचक पत्र लिहून काही कलमी कृती आराखडा दिला होता. महामंडळाच्या कार्यशैलीवरही त्यांनी पत्रातून काही ताशेरे ओढले होते. विदर्भ साहित्य संघाच्या घटनेप्रमाणे साहित्य संघाचे अध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष असावेत, असा नियम आहे. आतापर्यंत त्याप्रमाणेच घडले. पण प्रकृतीचे कारण समोर करीत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी महामंडळाचे अध्यक्ष होणे टाळले. महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर डॉ. श्रीपाद जोशी त्रासदायक ठरू शकतात, हे ओळखून त्यांनाच महामंडळावर नेण्याची क्लृप्ती म्हैसाळकरांनी केली असल्याची चर्चा सध्या साहित्य क्षेत्रात दबक्या आवाजात सुरू आहे.