नागपुरातही गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ रुग्ण; ५ जण भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:38 IST2025-01-31T16:35:07+5:302025-01-31T16:38:09+5:30

मागील वर्षी ५१ रुग्ण, ३ मृत्यू; घाबरण्याचे कारण नाही, दरवर्षीच दिसून येतात रुग्ण

Eight patients with Guillain-Barré syndrome in Nagpur; 5 admitted | नागपुरातही गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ रुग्ण; ५ जण भरती

Eight patients with Guillain-Barré syndrome in Nagpur; 5 admitted

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. पुण्यात याची रुग्णसंख्या वाढत असताना सांगलीतही काही रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. मात्र, डॉक्टरांनुसार घाबरण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडे दरवर्षी या आजाराचे रुग्ण दिसून येतात. २०२४ मध्ये नागपूरमध्ये ५१ रुग्ण व ३ मृत्यू तर यावर्षी जानेवारी महिन्यात ८ रुग्णांची नोंद झाली आहे.


जीबीएस' हा एक दुर्मीळ आजार आहे. याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. नागपूरमधील मेयो, मेडिकल, एम्स, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १ जुलै ते २५ 


२०२३ मध्ये २५ रुग्ण, ५ मृत्यूची नोंद
कोरोनांतर 'जीबीएस'चे रुग्ण वाढले होते. विशेषतः मेडिकलमध्ये २०२३ मध्ये २५ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. यात ९ लहान मुले व १६ प्रौढ रुग्ण होते.


२०२४ मध्ये मेडिकलमध्ये ३५ रुग्ण, ३ मृत्यू
२०२४ मध्ये मेडिकलसह एम्स, मेयो, लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये जवळपास ५१ रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये ३५ रुग्ण व ३ मृत्यू झाले. यात ११ लहान मुले होती.


५ रुग्ण सध्या आहेत भरती
जानेवारीत आतापर्यंत जीबीएसच्या ८ रुग्णांची नोंद झाली. यातील मेडिकलमध्ये ३, मेयो व शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १ असे एकूण ५ रुग्ण भरती आहेत.


रुग्णाची नोंद होताच आरोग्य विभागाला कळवा
"जीबीएस हा 'नोटीफायबल डिसीज' नाही. परंतु आता खबरदारी म्हणून सर्व शासकीय व खासगी रुग्णलयांमध्ये या आजाराच्या रुग्णाचे निदान होताच त्याची माहिती आरोग्य विभागाला कळविण्याचा सूचना दिल्या आहेत. या आजाराला घाबरून न जाता, लक्षणे दिसताच उपचार घ्या."
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर

Web Title: Eight patients with Guillain-Barré syndrome in Nagpur; 5 admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.