शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गेटवर दक्षता चमूला रोखले

By admin | Updated: July 7, 2014 01:12 IST

गुन्हेगारांना मोबाईल, मादक पदार्थांचा पुरवठा आणि एषोआरामाच्या सुविधा पुरवणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने पुण्यावरून आलेल्या दक्षता चमुला तुरुंगात फिरण्यापासून रोखले.

तुरुंगाच्या पाहणीसाठी टीम दाखल : पुण्यावरून निर्देश मिळाल्यावरच मिळाला प्रवेश जगदीश जोशी - नागपूरगुन्हेगारांना मोबाईल, मादक पदार्थांचा पुरवठा आणि एषोआरामाच्या सुविधा पुरवणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंग प्रशासनाने पुण्यावरून आलेल्या दक्षता चमुला तुरुंगात फिरण्यापासून रोखले. दरम्यान अपर महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दक्षता चमुला प्रवेश देण्यात आला. पुण्यातील तुरुंग मुख्यालयाने एका आमदाराद्वारे गँगस्टरचा वाढदिवस साजरा केल्याच्या घटनेबाबत पाहणी करण्यासाठी दक्षता टीम पाठविली होती. पाहणी केल्यानंतर तुरुंगातील परिस्थिती जैसे-थे असल्याचे सांगितले जाते. तुरुंगात गँगस्टरचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत गृहमंत्री आर.आर. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून तुरुंग प्रशासन हादरले आहे. तत्पूर्वी अपर महासंचालक मीरा बोरवणकर यांनी २८ जून रोजीच पुण्यावरून दक्षता टीम नागपूरच्या तुरुंगाची पाहणी करण्यासाठी पाठविली होती. तुरुंगात धाड टाकून तेथील परिस्थिती पाहण्याची टीमची योजना होती. सूत्रानुसार दक्षता टीम पहाटेच तुरुंगात पोहोचली होती. त्यांना सहज प्रवेश मिळेल, असा टीमच्या सदस्यांना विश्वास होता. परंतु तुरुंगाच्या मुख्य द्वारावर पोहोचताच त्यांना अडविण्यात आले. दक्षता टीमचे नेतृत्व करणारे सहायक आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याने आपली ओळख दिली आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेटवर असलेल्या पोलिसांनी अगोदर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचे सांगून त्यांना रोखून ठेवले. माहिती मिळूनही बऱ्याच उशिरापर्यंत तुरुंग प्रशासनातील कुठलेही अधिकारी दक्षता टीमच्या मदतीसाठी आले नाही. दरम्यान दक्षता टीम आल्याची माहिती कैद्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर आपत्तीजनक वस्तू तेथून हटविण्यात आल्या. तुरुंग अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तात्काळ माहिती मुख्यालयाकडे देण्यात आली. तेव्हा पुणे येथील मुख्यालयातून नागपूरच्या तुरुंग अधिकाऱ्यांना दक्षता टीमला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. हे निर्देश मिळण्यासाठी बराच वेळ निघून गेला. त्यामुळे तुरुंगातून दक्षता टीमला खाली हात परतावे लागले. धोका लक्षात घेऊन परतले तुरुंगाच्या आत पाहणी करताना दक्षता टीमला धोका असल्याचे दिसून आले. तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांसह दहशतवादी आणि नक्षलवादीसुद्धा कैद आहेत. कैद्यांच्या हावभावावरून दक्षता टीम घाबरली. काहीही हाती लागणार नाही, याची अगोदरच खात्री पटल्याने दक्षता टीम लवकरच परतली.