शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांनी विदर्भाचा चेहरामोहरा बदलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात शैक्षणिक संस्थांची मौलिक भूमिका असते. विशेषत: बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : समाजाला विकासाच्या दिशेकडे नेण्यात शैक्षणिक संस्थांची मौलिक भूमिका असते. विशेषत: बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विदर्भासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलून विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बुधवारी ऑनलाईन माध्यमातून आयोजित व्हीएनआयटीच्या १९ व्या दीक्षांत समारंभादरम्यान ते बोलत होते.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव डॉ. एस. आर. साठे प्रामुख्याने उपस्थित होते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन शासनाच्या अनेकविध प्रकल्पांमध्ये शैक्षणिक संस्था आपले योगदान देऊ शकतात. विशेषत: उद्योगांना लक्षात घेऊन कार्य करायला हवे. व्हीएनआयटीसारख्या संस्थांनी रस्ते अभियांत्रिकी, ड्रोन तंत्रज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या विकसित होत असलेल्या शाखांमध्ये योगदान देणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील नैसर्गिक संपदेचा विदर्भाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार संस्थेने करायला हवा. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान आणि कौशल्य समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, असे गडकरी म्हणाले. डॉ. पडोळे यांनी प्रास्ताविक केले.

वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाने मोठी उडी मारली आहे. कोरोना साथीच्या काळात नव्या तंत्रज्ञानालाही जन्म दिला आहे. पण, येत्या काळात अशा नव्या साथींना तसेच वातावरण बदलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, हे निश्चित आहे. त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये उत्तम संशोधन आणि इनोव्हेशन होणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. शेखर मांडे यांनी केले.

१,१३४ पदव्यांचे ऑनलाईन वितरण

ऑनलाईन कार्यक्रमात १ हजार १३४ विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. यात ४९ जणांना पीएच. डी., ३३३ जणांना एम. टेक., ६३४ विद्यार्थ्यांना बी. टेक. व ५९ विद्यार्थ्यांना बी. आर्क. ही पदवी प्रदान करण्यात आली. संशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४६ पदके आणि शैक्षणिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ऑनलाईन समारंभ असला तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष विद्यार्थी संचालकांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारत आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले होते.

.