शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण की फसवणूक? नागपुरातील २ विनापरवाना 'अल्पसंख्यांक' शाळांवर गुन्हा; बोगस मार्कशीटचे मोठे रॅकेट उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:07 IST

Nagpur : नागपुरात विनापरवाना अल्पसंख्यांक शाळांचा सुळसुळाट; गौसिया आणि जुबेदा शाळांच्या बोगस कारभारावर गुन्हा दाखल.

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात शिक्षणाच्या  पवित्र क्षेत्रातून  सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात चक्क शासनाची कोणतीही परवानगी न घेता दोन 'अल्पसंख्यांक शाळा' राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. या शाळांमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच खेळला गेला नाही, तर त्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट वाटून त्यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या तक्रारीनंतर आता या दोन्ही शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​नेमकं प्रकरण काय?

नागपूरमधील रहमतनगर आणि वांजरा परिसरात 'गौसिया माध्यमिक शाळा' आणि 'जुबेदा माध्यमिक शाळा' या दोन शाळा विनापरवाना चालवल्या जात होत्या. जिल्हा परिषद नागपूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या सखोल चौकशीनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या दोन्ही शाळा भंडारा जिल्ह्यातील 'अल्पसंख्यांक छप्परबंद शिक्षण संस्थे'द्वारे चालवल्या जात असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

​विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ: बोगस टीसी आणि मार्कशीट​मिळालेल्या माहितीनुसार, गौसिया माध्यमिक शाळेत आतापर्यंत ४५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, ज्यापैकी १७९ विद्यार्थी सध्या तिथे शिक्षण घेत आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या टीसी (Transfer Certificate) आणि गुणपत्रिका (Mark-sheet) पूर्णपणे बोगस असल्याचे समोर आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि भविष्य पूर्णपणे टांगणीला लागले आहे.

​नोकरीच्या नावाखाली शिक्षकांचीही लूट

​हे रॅकेट केवळ विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित नसून, शिक्षकांचीही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. शाळेत कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार शिक्षकांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक माहिती राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडे प्राप्त झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रशासकीय दिरंगाई आणि संस्थेच्या मनमानीवर ताशेरे ओढले आहेत.​​प्रशासकीय कारवाई आणि पुढील पाऊल

​शिक्षण विभागाने दिलेल्या तक्रारीवरून आता संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता प्रश्न उरतो तो तिथे शिक्षण घेत असलेल्या १७९ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. या विद्यार्थ्यांना इतर अधिकृत शाळांमध्ये सामावून घेण्याबाबत शिक्षण विभाग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"नागपुरात विनापरवाना शाळा चालवून अल्पसंख्यांक समाजाच्या मुलांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. जिल्हा परिषदेच्या चौकशीत या शाळांकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले असून, विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत. तसेच शिक्षकांकडून नोकरीच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या तक्रारीही गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही. अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."- प्यारे खान (अध्यक्ष, राज्य अल्पसंख्यांक आयोग)

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Unlicensed minority schools busted for fake marksheets; fraud exposed.

Web Summary : Two unlicensed minority schools in Nagpur issued fake marksheets. Students and teachers were defrauded. Police investigation is underway following a complaint. Authorities are taking action.
टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूरfraudधोकेबाजी