आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही प्रासंगिक : एस.के. कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:48 IST2019-04-17T20:47:06+5:302019-04-17T20:48:17+5:30

डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे प्रासंगिक’ या विषयावर उर्वेला कॉलनी, वर्धा रोड येथील बानाई सभागृहात आयोजित परिसंवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

Economic consideration of Ambedkar is relevant today: S.K. Kadu | आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही प्रासंगिक : एस.के. कडू

आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही प्रासंगिक : एस.के. कडू

ठळक मुद्देआंबेडकरांच्या आर्थिक विचारावर परिसंवाद

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे प्रासंगिक’ या विषयावर उर्वेला कॉलनी, वर्धा रोड येथील बानाई सभागृहात आयोजित परिसंवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर यावेळी राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझरचे महासंचालक निरंजन सोनक, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक उपस्थित होते.
कडू म्हणाले, १०० वर्ष पुढचा विचार करून आर्थिक विचार मांडणारा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख निर्माण होणे गरजेचे होते. परंतु त्यांच्या या निपुणतेचे व्हावे तेवढे गुणगान झाले नाही. त्यांना जनसामान्यांचा कळवळा होता. सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे सर्वच विषय त्यांनी अर्थशास्त्रात विस्तृतपणे मांडले आहेत. ते विचार आजही प्रासंगिक आहेत आणि आजही लागू होतात.
निश्चय शेळके म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार समाजात रुजले नाहीत. ते रुजविण्यासाठी डिक्की सतत प्रयत्नरत आहेत. याप्रसंगी मुंबईचे उपाध्यक्ष अरुण धनेश्वर, विदर्भाचे उपाध्यक्ष राजेश दवंडे, वेस्ट इंडियाचे बँकिंगविषयक प्रमुख विजय सोमकुंवर, महाराष्ट्र महिला शाखेच्या मार्गदर्शक विनी मेश्राम, विदर्भ महिला शाखेच्या उपाध्यक्ष क्रांती गेडाम, रिता पोटपोसे, डिक्की विदर्भ कौन्सिलचे पदाधिकारी श्रद्धानंद गणवीर, राज मेंढे, अतुल भांगे, प्रदीप मेश्राम, समीर गेडाम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Economic consideration of Ambedkar is relevant today: S.K. Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.