शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूर कोळसा खाणीच्या गोदामाला आग

By admin | Updated: May 19, 2014 00:43 IST

दुर्गापूर खुल्या कोळसा खाण परिसरात असलेल्या क्षेत्रीय भंडाराला रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

 मोठा अनर्थ टळला : ५० लाख रुपयांचे साहित्य खाक

चंद्रपूर : दुर्गापूर खुल्या कोळसा खाण परिसरात असलेल्या क्षेत्रीय भंडाराला रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. दुर्गापूर कोळसा खाण परिसरात चंद्रपूर वेकोलिचे क्षेत्रीय भंडार आहे. या भंडारातून चंद्रपूर क्षेत्रात असलेल्या सर्व कोळसा खाणींना लागणारे साहित्य पुरविले जाते. जुन्या साहित्याचा साठाही याच ठिकाणी केला जातो. कोळसा खाणीत कोळसा व माती उत्खननाकरिता मोठमोठ्या वाहनांचा उपयोग केला जातो. या वाहनांचे जुने टायरसुद्धा येथे साठविण्यात येतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य आहे. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथे साठवून ठेवलेल्या टायरला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररुप धारण केल्याने परिसरात सर्व साहित्य आगीने क्षणात आपल्या कवेत घेतले. याच परिसरात मोठ्या संख्येने आॅईलने भरलेले ड्रम तसेच काही अंतरावर वेकोलिचे क्षेत्रीय भंडारचे कार्यालयही आहे. या आगीमध्ये टायर, भंगारातील चार चाकी वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती अधिकार्‍यांना देण्यात आली. त्याचवेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. चंद्रपूर वीज केंद्रातील दोन, महानगरपालिकेचे दोन अशा चार अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमध्ये जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उल्लेखनिय असे की, मागील वर्षी सुद्धा याच परिसरात आग लागली होती. त्यामुळे यात काही गौंडबंगाल असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. (नगर प्रतिनिधी)