शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील गावांनाच मदतीची हुलकावणी

By admin | Updated: May 14, 2014 02:04 IST

दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली

संतोष तांगडे - बोरीअरब (यवतमाळ)

दारव्हा तालुक्यात बर्फवृष्टीसारखी गारपीट झाली. प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन मदतीचे आश्‍वासन दिले. मदतीची यादीही लागली. मात्र ज्या गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्या गावांची नावेच मदतीच्या यादीत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

यवतमाळ जिल्हय़ात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली. संपूर्ण रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब आणि कंझारा परिसरातही बर्फवृष्टीचा झाली. संपूर्ण शेतशिवार गारांमुळे पांढरे झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२ मार्च रोजी बोरीअरब येथे आले. कंझारा शिवारातील किरण कावरे यांच्या शेतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांपुढे तत्काळ मदतीचे आश्‍वासन दिले.

मुख्यमंत्री गेल्यानंतर गारपीटग्रस्त भागाचे सर्वेक्षण झाले. कृषी विभागाने तहसीलला याद्या पाठविल्या. दारव्हा तालुक्यासाठी साडेबारा कोटी रुपये मदतही आली. १0६ गावांचे वाटप जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाले. मात्र या मदतीच्या यादीत मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेले बोरीअरब आणि कंझारी ही दोन गावे दिसतच नव्हती. हा प्रकार पाहून शेतकरी अचंबित झाले. अधिक चौकशी केली असता कृषी सहायकाने या दोन गावांचे सर्व्हेक्षण करून यादी कृषी विभागाला उशिरा पाठविली. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर यादी प्रसिद्धही केली नाही.

परिणामी कृषी विभागाकडून तहसीलकडे आणि तहसीलकडून बँकेकडे या गावातील शेतकर्‍यांची नावेच आली नाही.

बोरीअरब येथे गारपिटीत १२३ शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून त्यांना १९ लाख ७0 हजार ४00 रुपये तर कंझारा येथील ६७ शेतकर्‍यांसाठी ९ लाख ६२ हजार ५00 रुपये मंजूर झाले आहे. आता कुठे या याद्या तहसीलमध्ये आल्या. तेथून बँकेत येतील आणि नंतर शेतकर्‍यांना वाटप होईल. मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या दोन गावांना पहिल्या टप्प्यातच मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु दप्तर दिरंगाईने ही दोन गावेच मदतीपासून वंचित आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.