शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबळी : सासूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 5, 2017 02:47 IST

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी महाजनवाडी येथील एका विवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी महाजनवाडी येथील एका विवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने आरोपी सासूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. उमा विजयसिंग गौतम (५२), असे आरोपी महिलेचे नाव आहे. स्वाती विकास गौतम (३०), असे मृत विवाहितेचे नाव होते. ती २५ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास महाजनवाडी येथील आपल्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली होती. हिंगणघाट येथील रहिवासी सुषमा धवसिंग गौर यांची मुलगी स्वाती हिचा विवाह २०१० मध्ये विकास विजयसिंग गौतम याच्यासोबत झाला होता. लग्नाला एक महिनाही झाला नसावा तोच सासरची मंडळी नेहमी पैशाची मागणी करीत होते. तिला क्रूर वागणूक देत होते. तू मरत असशील तर, असे ते तिला म्हणायचे. स्वातीच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी प्रारंभी ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ३०४ (ब) हे कलम वाढवण्यात आले होते. पोलिसांनी पती विकास आणि सासरे विजयसिंग गौतम यांना अनुक्रमे २६ आणि २८ एप्रिल रोजी अटक केली. ते कारागृहात आहेत. सासू उमाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, सरकारतर्फे विरोध करण्यात आला. स्वातीच्या मृत्यूच्या घटनेच्या वेळी केवळ सासू उमा हजर होती. त्यामुळे गळफास घेण्यापूर्वी काय घडले, हे उमालाच माहीत आहे. तीच या घटनेमागील मुख्य सूत्रधार आहे, तिला अटक होणे आवश्यक आहे. सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने उमाचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)