शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाबा डोंगरेंना हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: July 7, 2015 02:30 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून दाखल एफआयआर रद्द करण्याची तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाबा भगवान डोंगरे..

सहायक पोलीस आयुक्त : एफआयआर रद्द करण्यास नकारनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून दाखल एफआयआर रद्द करण्याची तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाबा भगवान डोंगरे (५५) यांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. या निर्णयामुळे डोंगरे यांना जोरदार दणका बसल्याचे बोलले जात आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांनी हा निर्णय दिला. याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजीव जैन व तपास अधिकारी शुभांगी देशमुख हे न्यायालयात उपस्थित होते. विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी डोंगरे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), १३(२) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. मनोजकुमार कृपाशंकर सिंह यांनी डोंगरे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, कोराडी रोडवरील गुलमोहर कॉम्प्लेक्स येथे सिंह यांचा बार व सिक्युरिटी एजन्सीचे कार्यालय आहे. याच कॉम्प्लेक्समध्ये व्यवसाय करणारे डॉ. अतुल विद्यार्थी यांच्यासोबत सिंह यांचा पार्किंगवरून वाद सुरू होता. यासंदर्भात सिंह यांनी दोन-तीनदा कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली पण, काहीच कारवाई करण्यात आली नाही. परंतु, विद्यार्थी यांनी एकदाच तक्रार केल्यानंतर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची फाईल सहायक पोलीस आयुक्त कार्यालय पाचपावलीकडे पाठविण्यात आली होती. त्यावेळी या कार्यालयात डोंगरे हे सहायक पोलीस आयुक्त होते. डोंगरे यांनी सिंह यांना विविध प्रकारची भीती दाखवून सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली. सिंह यांनी डोंगरे यांच्या सूचनेप्रमाणे एका पोलीस कर्मचाऱ्याला ही रक्कम दिली. यानंतर डोंगरे यांनी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. सिंह यांना पैसे द्यायचे नव्हते. यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. यावरून गेल्या १७ फेब्रुवारी रोजी मानकापूर येथे रचण्यात आलेला सापळा अपयशी ठरला. यानंतर २१ फेब्रुवारी रोजी डोंगरे यांच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. यावेळी डोंगरे यांना १० हजार रुपयांच्या लाचेसह अटक करण्यात आली. उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी प्रकरणातील विविध महत्त्वपूर्ण मुद्यांकडे लक्ष वेधले. न्यायालयाने त्यांचे काही मुद्दे ग्राह्य धरून डोंगरे यांची याचिका खारीज केली.(प्रतिनिधी)