शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
4
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
5
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
6
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांवर आरोप

By admin | Updated: May 10, 2014 23:44 IST

तोंडावरच्या फोडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला.

पत्नीने केली पोलिसांकडे तक्रार

नागपूर : तोंडावरच्या फोडाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. ध्यानीमनी नसताना घरचा कर्ता जीव गमावल्यामुळे मृत व्यक्तीचा परिवार झटक्यात निराधार झाला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही संतापजनक घटना आहे. किशोर भास्करराव गावंडे (वय ४६) असे मृताचे नाव असून, ते राज्य परिवहन महामंडळाच्या काटोल आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नोकरीव्यतिरिक्तचा वेळ सामाजिक कार्यात देत असल्यामुळे ते सर्वत्र सुपरिचित होते. त्यांच्या तोंडावर फोड आल्यामुळे काही दिवसांपूर्वी नंदनवनमधील यश बीअर बारच्या मागे असलेल्या जमाईवार हॉस्पिटलमध्ये ते उपचाराला गेले. किशोर यांची पत्नी सुनंदा यांच्या तक्रारीनुसार, डॉ. भूपेंद्र जमाईवार यांनी किशोर यांना छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गावंडे आपल्या परिवारासह ८ मेच्या दुपारी २.३० वाजता जमाईवार हॉॅस्पिटलमध्ये गेले. तोपर्यंत सर्व ठीक होते. डॉक्टरने शस्त्रक्रियेपूर्वी गावंडेंना सलाईन लावली. त्यात काही इंजेक्शनही टाकले. त्यानंतर काही वेळेतच किशोर यांची प्रकृती खालावली. ते ओकारी करू लागले. तोंडातून फेसही येऊ लागला. डॉक्टरांनी अ‍ॅम्बुलन्स बोलवली आणि त्यांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील रहाटे हॉस्पिटलला नेले. तेथे ४ ते ४.१५ या वेळेत किशोर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री ११.३० वाजता डॉक्टरांनी शवविच्छेदनासाठी किशोर यांचा मृतदेह पोलिसांच्या हवाली केला. चांगले हसतखेळत रुग्णालयात गेलेल्या किशोर यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते डॉक्टरांनी सांगितलेच नाही. त्यांना सलाईनमधून कोणती औषधे दिली, त्याचाही खुलासा डॉ. जमाईवार यांनी केला नाही. पतीचा असा तडकाफडकी मृत्यू झाल्यामुळे सुनंदा गावंडे आणि त्यांचा परिवार झटक्यात निराधार झाला आहे. मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक कार्यात धावून जाण्याची वृत्ती असलेल्या किशोर यांच्या अकाली निधनाने परिसरातही तीव्र शोककळा पसरली आहे.