होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:49 PM2018-04-09T20:49:16+5:302018-04-09T21:38:02+5:30

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.

Due to Homeopathic worse diseases are getting cure | होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

googlenewsNext
ठळक मुद्देहोमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर : हृदयविकार, वंध्यत्व, त्वचारोग, अस्थमा, मानसिक आजारावर यशस्वी उपचारजागतिक होमिओपॅथी दिन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.
१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी एकत्र येऊन सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आॅरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, डॉ. सोनल पंचभाई, डॉ. स्वप्निल घायवट, डॉ. कुणाल अंबाडे, डॉ. सचिन धमगाये, डॉ. स्मिता अडकिने, डॉ. यशस्वी सातपुते, डॉ. रूपाली कारवा व डॉ. खुशबू मुरारका आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असले तरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.
‘बायपास’वर होमिओपॅथी
यावेळी होमिओपॅथीमुळे बरे झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव सांगितले, ५१ वर्षीय संजय गडपायले म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळून आले. यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रिया करायची नव्हती म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि थोड्याच दिवसात बरे वाटू लागले. त्यानंतर केलेल्या रक्ताच्या तपासण्या सर्वसामान्य आल्या. ४००वर पोहचलेले कोलेस्ट्रॉलही सामान्य झाले, असेही त्यांनी सांगितले. सविता पाटील म्हणाल्या, अचानक हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध पडले. ईसीजी काढल्यावर त्यात हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले. होमिओपॅथी तज्ज्ञाने उपचार केला व काही तासात बरे वाटू लागले. तरीही डॉक्टरांनी देखभालीसाठी रात्रभर हॉस्पिटलमध्ये भरती ठेवून दुसऱ्या दिवशी सुटी दिली. ईसीजीपासून इतर सर्व तपासण्या सामान्य आहेत, असेही त्या म्हणाल्या.

वंध्यत्वावर होमिओपॅथी प्रभावशाली

मोना जोशी या महिलेने सांगितले, लग्नानंतर मूल न झाल्याने वंध्यत्वावर नागपुरातील स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञाकडून उपचार घेतले, शेवटी मुंबईतही उपचार घेतले. सलग आठ वर्षे उपचार घेऊनही वंध्यत्वाची समस्या कायम होती. शेवटचा पर्याय म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि महिन्याभरातच गर्भ राहिला. आज मुलगी पाच वर्षांची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी अन्य रुग्णांनीही आपले अनुभव कथन केले. गंभीर रोगावर होमिओपॅथीशिवाय पर्याय नाही असे त्यांचे म्हणणे होते.

१९७८ पासून मनपा होमिओपॅथीचे दोनच क्लिनिक
डॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथी मुळासकट आजार बरा करीत असली तरी महानगरपालिकेकडून ही पॅथी दुर्लक्षित झाली आहे. मनपाने १९७८ मध्ये दोन होमिओपॅथी क्लिनिक सुरू केले, परंतु आजही त्यांची संख्या दोनच आहे. त्या तुलनेत अ‍ॅलोपॅथी क्लिनिकची संख्या वाढली आहे. 

Web Title: Due to Homeopathic worse diseases are getting cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.