शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

धवनकरांमुळे कुलगुरूंची कोंडी

By admin | Updated: June 16, 2015 02:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठावर धडक दिली.

शैक्षणिक सहलीत गैरव्यवहाराचा आरोप : विद्यार्थी पुन्हा धडकले नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठावर धडक दिली. विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी शैक्षणिक सहलीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, डॉ. धवनकर यांनी या दौऱ्यातील हिशेब सादर केला असून, त्याचे ‘आॅडिट’ झाल्यावर १९ तारखेला पुढील निर्णय घेऊ, असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.नवी दिल्ली येथे विभागाच्या विद्यार्थ्यांचा ‘स्टडी टूर’ गेला होता. यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत ३७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी लावला आहे. याबाबत धवनकर यांना हिशेब मागितला असता त्यांनी त्याला दाद दिली नाही. काही दिवसांअगोदर नवी दिल्लीहून परतल्यावर त्यांनी बोगस देयके दिली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे तक्रार केली होती. धवनकर यांना हिशेब सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी हिशेब जमा केला. परंतु विद्यार्थी त्यावर समाधानी नाहीत. यासंदर्भात सुमारे ४० विद्यार्थ्यांनी सोमवारी कुलगुरूंची भेट घेतली.डॉ. धवनकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सर्व कागदपत्रे व देयकांची ‘आॅडिटर्स’ कडून तपासणी करू व त्यानंतरच योग्य तो निर्णय घेऊ, असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले. विद्यार्थी मात्र आपल्या मागणीवर अडून होते व त्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. विद्यापीठ प्रशासन तसेच कुलगुरू हे दबावात असून धवनकर यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या मुद्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विद्यार्थी भेट घेणार आहेत. १९ तारखेला जर कुलगुरूंनी विभागप्रमुखांवर कारवाई केली नाही तर जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)