दारुच्या नशेत वाद, मित्रांनी केली गुंडाची हत्या टेलिफोन एक्स्चेंज चौकात थरार

By योगेश पांडे | Published: November 24, 2023 11:18 PM2023-11-24T23:18:54+5:302023-11-24T23:19:08+5:30

योगेश पांडे  नागपूर : दारुच्या नशेत वाद झाल्यानंतर सोबतच बसलेल्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलवारीची वार करत हत्या केली. ...

Drunken argument, friends kill goon in Telephone Exchange Chowk | दारुच्या नशेत वाद, मित्रांनी केली गुंडाची हत्या टेलिफोन एक्स्चेंज चौकात थरार

दारुच्या नशेत वाद, मित्रांनी केली गुंडाची हत्या टेलिफोन एक्स्चेंज चौकात थरार

योगेश पांडे 

नागपूर :
दारुच्या नशेत वाद झाल्यानंतर सोबतच बसलेल्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलवारीची वार करत हत्या केली. मृतक व आरोपी दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचेच असून या घटनेमुळे टेलिफोन एक्स्चेंज चौकाजवळ खळबळ उडाली होती. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
विजय पन्नालाल चव्हाण (३५, नंदनवन झोपडपट्टी) असे मृतकाचे नाव आहे. तो त्याचे मित्र विजय उर्फ भैरव दिलीप डायरे (३६, वाठोडा) व रुपेश रामराव मून (३२, जयभीम चौक) यांच्यासोबत टेलिफोन एक्स्चेंज चौकातील आगलावे दारू भट्टीजवळ बसला होता.

तिघांनीही दारू ढोसली व नशेत ते बरळायला लागले. काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला. भांडण वाढले आणि काही कळायच्या आतच भैरव व रुपेशने विजयवर तलवारीसदृश शस्त्राने वार केले. त्यात विजय रक्तबंबाळ झाला. घटनास्थळावर यामुळे खळबळ उडाली व दोन्ही आरोपी फरार झाले. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

लकडगंज पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. विजयचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात नेमका प्रकार लक्षात आला. पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आरोपींच्या घराचे पत्ते शोधले. वैभव डायरेला रात्री अटक करण्यात आली तर रुपेश फरार आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व मृतक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते. भैरव हा बराच काळ तुरुंगात होता व काही दिवसांअगोदरच परतला होता.

Web Title: Drunken argument, friends kill goon in Telephone Exchange Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.