शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नगर पंचायत-परिषद निवडणूक मतदानावर ‘ड्रोन’ने वॉच, पोलिसांचा जागोजागी कडेकोट बंदोबस्त

By योगेश पांडे | Updated: December 1, 2025 23:02 IST

यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर ग्रामीण जिल्हयातील नगर पंचायत व नगर परिषद निवडणूकीसाठी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे ड्रोन पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे.सावनेर, कळमेश्वर, मोहपा, खापा, काटोल, नरखेड, कन्हान पिपरी, उमरेड, रामटेक, बोरी अशा एकूण ११ नगरपरिषद तसेच मोवाड़, कोंढाळी, कांद्री, मौदा, भिवापूर, पारशिवनी अशा एकुण ५ नगरपंचायतींअंतर्गत मतदान प्रक्रिया होणार आहे.

यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह १८ पोलीस निरीक्षक, ९६ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार १७४ पोलीस अंमलदार, ७०० होमगार्ड्स, राज्य राखीव दलाच्या दोन कंपनी, दोन दंगा नियंत्रण पथके, दोन क्यूआरटी पथक व सहा अतिरिक्त पथके नेमण्यात आली आहेत.

संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष 

मतदान केंद्र, स्ट्रॉंग रूम्स येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

७७ गुन्हेगार तडीपार

महिन्याभरात पोलिसांनी ७७ गुन्हेगारांना तडीपार केले तर सहा जणांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. तीन टोळ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई झाली आहे. १८७ जणांविरोधात अवैध दारूविक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय २३२ गुन्हेगारांवर कलम १२६ तर ४०९ जणांविरोधात कलम १२९ अंतर्गत कारवाई झाली आहे.

सीमेवरदेखील बंदोबस्त

आंतरराज्यीय सीमेवरदेखील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून बॅरिकेड्ससह नाकाबंदी केली आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी हॉटेल्स, लॉज, धाबे व फार्म हाऊसेसचीदेखील तपासणी केली आहे.

नागपुरातील पोलीसदेखील तैनात

दरम्यान, निवडणूकीचा काही भाग नागपूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गतदेखील येतो. त्यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांसोबतच अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Election: Drone Watch, Tight Security for Nagar Panchayat Polls

Web Summary : Nagpur rural police deploy heavy security for Nagar Panchayat elections, including drone surveillance. 18 inspectors, 96 officers, and 1174 constables are on duty. 77 criminals were exiled and stringent action taken against illegal liquor sales to ensure peaceful elections.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकPoliticsराजकारणPoliceपोलिस