शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताचे दुहेरी दडपण : राष्ट्रपतींचा दौरा अन् विधी सेवा प्राधिकरणाचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:01 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनीही सुटकेचा निश्वास टाकला.

ठळक मुद्देसर्व सुरळीत, सुरक्षा यंत्रणांनी टाकला सुटकेचा निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनीही सुटकेचा निश्वास टाकला.भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वर्धा येथे गेले आणि तेथून दुपारी पुन्हा विमानतळावर आले. विमानतळ ते राजभवन आणि काही तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा विमानतळ असा प्रवास ते मोटारीने करणार होते. त्यामुळे हा मार्ग (रस्ता) दोहोबाजुने सिल करण्यात आला होता. या मार्गावर बंदोबस्तासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. विमानतळावर आणि राजभवनाच्या सभोवतालही कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यासाठी शहर पोलीस दलातील चार पोलीस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, ५४ उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक, ४७३ पुरुष तर ६३ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय एसआरपीएफ, आरसीपी आणि क्यूआरटीही मदतीला बोलवून घेण्यात आली होती. विमानतळ ते राजभवनपर्यंतच्या मार्गावर वॉचर आणि गुप्तचरही पेरण्यात आले होते. जागोजागी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करवून घेण्यात आली होती.ऐनवेळी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणेकडून सेफ झोन तयार करण्यात आले होते.राष्ट्रपतींच्या या बंदोबस्तासोबतच पोलिसांवर आणखी एका बंदोबस्ताची जबाबदारी होती. राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अखिल भारतीय संमेलन शनिवारी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश या संमेलनात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मुंबईवरून आलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी रात्रीपर्यंत बैठका घेतल्या. सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून त्याप्रमाणे दोन्ही बंदोबस्ताची उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडण्यात आली. राष्ट्रपतींचा दौरा अन् विधी सेवा प्राधिकरणाचे संमेलन चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.

 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षNagpur Policeनागपूर पोलीस