शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्राबाबतच्या भूलथापांना बळी पडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:12 IST

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथेजेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर जेथेजेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. यासंदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम असून कुठल्याही भूलथापांना नागरिकांनी बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी केले आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार यापूर्वी अखेरचा रुग्ण निगेटिव्ह आल्यापासून पुढील २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र ठेवावे लागत होते. आता १७ मे रोजी आलेल्या नवीन गाईडलाईननुसार संबंधित परिसरात अखेरचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या दिवसापासून पुढील २८ दिवस ते क्षेत्र प्रतिबंधित राहील. या गाईडलाईननुसारच नागपुरात अंमलबजावणी सुरू आहे. हे निर्णय शासनाचे आहेत. विशेष म्हणजे यामागे वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारण आहे. २८ दिवसाला १४ आणि १४ अशा दोन भागात वैद्यकीय दृष्ट्या विभागण्यात आले आहे. पहिले १४ दिवस अ‍ॅक्टिव्ह आणि नंतरचे १४ दिवस पॅसिव्ह असे हे वर्गीकरण आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला त्या रुग्णाच्या परिसरातील ९५ टक्के लोकांना २ ते १४ दिवसात कोरोनाची लागण होऊ शकते. उरलेल्या पाच टक्क्यांपैकी अडीच टक्के लोकांना ० ते २ दिवसादरम्यान तर उर्वरीत अडीच टक्के लोकांना १४ व्या दिवसानंतर २८ व्या दिवसापर्यंत लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडीच टक्क्याच्या शक्यतेमुळे २८ दिवस संबंधित क्षेत्र प्रतिबंधित ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. नागपूर लवकर कोरोनामुक्त होऊन कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये यावा, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या