शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीची कारवाई करू नका

By admin | Updated: March 5, 2016 03:01 IST

सिंचन घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर

हायकोर्टाचे निर्देश : सिंचन घोटाळा प्रकरण, एसीबी विरुद्ध एफए कन्स्ट्रक्शनची याचिकानागपूर : सिंचन घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सुरू केलेल्या कारवाईविरुद्ध एफए कन्स्ट्रक्शन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने कंपनीच्या एका भागीदाराने तपासात सहकार्य करावे, या अटीवर कंपनीविरुद्ध सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहे. न्यायालयाने प्रतिवादींना एक आठवड्यात उत्तर मागणारी नोटीस जारी केली आहे. राज्यातील राजकीय सत्ता बदलताच राजकीय वैरत्व म्हणून भ्रष्टाचारविरोधी विभाग (एसीबी) ने सिंचन घोटाळ्यात एफए कन्स्ट्रक्शन आणि भागीदारांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यांची नावे एसीबीने दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालात आहेत. ही कारवाई थांबावी म्हणून एफए कन्स्ट्रक्शनने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा एक भाग असलेल्या घोडाझरी कालव्याच्या बांधकामातील कथित घोटाळाप्रकरणी एसीबीने आपल्या पहिल्या प्रथम खबरी अहवालात एफए कन्स्ट्रक्शन आणि विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (सी), १३ (१) (डी), १३ (२) आणि भादंविच्या १२०-ब, १०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. सरकारचे आरोप बिनबुडाचेनागपूर : एफए कन्स्ट्रक्शन आणि कंपनी संचालक जैतून फतेह मोहम्मद खत्री, निसार फतेह मोहम्मद खत्री, आबिद फतेह मोहम्मद खत्री आणि झहीद फतेह मोहम्मद खत्री यांनी २४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर ७२ तासांची स्थगिती मिळवून घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठाकडे धाव घेऊन एक आठवड्याच्या प्रवास जामिनासाठी प्रार्थना केली. याचिकाकर्त्यांनी एसीबीवर आरोप करताना याचिकेत असे म्हटले की, यापूर्वीच्या सरकारसोबत आमचे नजीकचे संबंध असल्याने आम्हाला भक्ष्य ठरवण्यात आले. आमच्याविरुद्धच्या आरोपाची कोणतीही प्रत्यक्षरीत्या पडताळणी न करता आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही फौजदारी कारवाई म्हणजे आधीचे सरकार आणि सरकारातील अधिकारी यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. लोकप्रियता प्राप्त करण्यातून सरकार आणि एसीबी निष्पाप व्यक्तींना बळीचा बकरा बनवित असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या कंत्राटदारांनी असाही दावा केला की, कंपनीचे दोन भागीदार खूपच वृद्ध आणि आजारी आहेत. अन्य दोघांचा तात्पुरता सहभाग आहे केवळ निसार खत्री हेच दैनंदिन कारभार पाहतात. घोडाझरी कालव्याच्या प्रकरणात एफए कन्स्ट्रक्शनचे निसार खत्री यांचा समावेश असलेल्या भागीदारांविरुद्ध दस्तावेजात हेराफेरी करणे, माहिती दडवणे, सरकार आणि व्हीएडीसीची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कंत्राट आणि व्यवसायाशी संबंधित बरेच दस्तावेज एफए कन्स्ट्रक्शनकडून एसीबीने जप्त केलेले आहेत. याचिकाकर्त्यांनी सर्व आरोप बिनबुडाचे, अयोग्य आणि कलुषित भावनेतून करण्यात आल्याचे म्हटले आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शशांक मनोहर, अ‍ॅड. श्याम देवाणी तर सरकारच्या वतीने सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)