शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जखमींकडे दुर्लक्ष करू नका, मदत करा

By admin | Updated: February 2, 2015 01:07 IST

अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता कर्तव्य म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केले.

मुख्यमंत्री: रस्ता सुरक्षा अभियान पुरस्कार वितरणनागपूर : अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता कर्तव्य म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना केले.राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आंतर विद्यापीठ रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, पोलीस आयुक्त के.के. पाठक, वाहतूक शाखेचे अतिरिक्त महासंचालक सुरेद्र पांडे उपस्थित होते.अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र असे न करता जखमींना तत्काळ कशी मदत मिळेल यासाठी युवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.यावेळी विद्यापीठस्तरावर प्रथम आलेल्या भारती विद्यापीठाला ५ लाख व फिरते चषक, व्दितीय पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व तृतीय पुरस्कार प्राप्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला ७५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विशेष पुरस्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाही यावेळी विशेष पुरस्कार देण्यात आले. (प्रतिनिधी)अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी २३ महामार्गावर पोलीस केंद्रदेशात सर्वाधिक अपघात महाराष्ट्रात होत असून १८ ते ३० वयोगटातील वाहन चालकांमध्ये अपघाताचे प्रमाण राज्यात अधिक आहे. अपघात झाल्यावर मदतीसाठी राज्यातील २३ महामार्गावर ६३ महामार्ग पोलीस केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) सुरेंद्र पांडे यांनी सांगितले.