शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर नकोच, थेट खटला भरा

By admin | Updated: June 30, 2015 03:06 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० अंतर्गत अदखलपात्र गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध थेट प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी

सहकारी कायद्यातील गुन्हे : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णयराकेश घानोडे ल्ल नागपूरमहाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० अंतर्गत अदखलपात्र गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध थेट प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करणे बंधनकारक असून, अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविणे अवैध आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. कायद्याच्या कलम १४६ मध्ये विविध गुन्ह्यांची माहिती देण्यात आली असून, त्या गुन्ह्यांसाठी कोणती शिक्षा करायची, याची तरतूद कलम १४७ मध्ये आहे. कलम १४६ मधील अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवू शकत नाही. तसेच कलम १४८ अनुसार प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयापेक्षा कनिष्ठ असलेल्या कोणत्याही न्यायालयात या कायद्यांतर्गत खटला चालवता येत नाही आणि सहकार निबंधकाच्या संमतीशिवाय खटला दाखल करता येत नाही. या कायद्यामध्ये संबंधित आरोपीविरुद्ध केवळ जेएमएफसी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्याची तरतूद असून, एफआयआर नोंदविण्यासंदर्भात कोठेच उल्लेख नाही, असा खुलासा निर्णयात करण्यात आला आहे. हा निर्णय सहकार अधिकाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. वादग्रस्त एफआयआर रद्दहा निर्णय देणारे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी एका प्रकरणात महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे. मनोरंजन राठोड असे आरोपीचे नाव असून, ते पुसद (यवतमाळ) येथील सहकार निबंधक कार्यालयात वरिष्ठ लिपिक होते. त्यांची एका गृहनिर्माण संस्थेवर अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी कोणतीही कागदपत्रे न तपासता संस्थेच्या दोन भूखंडांची परस्पर विक्री केली. यामुळे ११ आॅगस्ट २०१० रोजी सहायक निबंधकाच्या तक्रारीवरून पुसद पोलिसांनी राठोड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम १४७ अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. एफआयआर नोंदविताना शासनाची परवानगी घेण्यात आली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदी लक्षात घेता त्यांचा अर्ज मंजूर केला. अर्जदारातर्फे अ‍ॅड. एच. आर. धुमाळे यांनी बाजू मांडली.