शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद्यांना थारा देऊ नका

By admin | Updated: October 9, 2014 01:01 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका,

आर. आर. पाटील : वाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभावाडी : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विविध मार्गाने केलेल्या प्रचाराला मतदार बळी पडले. विधानसभा निवडणुकीत अशा प्रचाराच्या आहारी जाऊ नका तसेच जातीयवाद्यांना थारा देऊ नका, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी केले.हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश बंग यांच्या प्रचारार्थ आर. आर. पाटील यांची वाडी येथे जाहीर सभा झाली. त्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्यावेळी काळा पैसा देशात आणण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र त्यांना अद्याप काळा पैसा अद्याप देशात आणता आला नाही. केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेबाबत केवळ चर्चा करत असून गंभीर नाही. सभागृहाचे कामकाज बंद पाडणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपने उमेदवारी दिली, असा आरोप करून ही मंडळी भाजपमध्ये येताच पवित्र कसे होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.सध्या महाराष्ट्रात ‘आयाराम - गयाराम’ची संस्कृती मूळ धरत आहे. काही पक्ष अशांना उमेदवारी देऊन मतदारांना बनविण्याचे काम करीत आहे. मतदारांनी या संस्कृतीच्या आहारी जाऊ नये. नागपूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आर. आर. पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आ. प्रकाश गजभिये, रमेश बंग, उमेश पाटील, प्रगती पाटील, राजेश जयस्वाल, मोहन ठाकरे, कृष्णा तायडे, मोहन हिरणवार, गंगाप्रसाद ग्वालवंशी, प्रा. कोठे, प्रा. मोरे, वंदना पाल, उज्ज्वला बोढारे, राजाभाऊ ताकसांडे, अहमद शेख, अशोक माने, दत्ता वानखेडे, भीमराव लोखंडे, गणपत पाटील, नरेश बारई, दिनेश उईके, योगेश चरडे, अविनाश चौधरी, किताबसिंग चौधरी, नाना इखनकर, गणपत रागीट, सुनंदा ठाकरे, महेंद्र शर्मा, ईश्वर बाळबुधे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्याम मंडपे यांनी केले. संचालन प्रतिभा मोरे यांनी केले तर, संतोष नरवाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)