घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार
By दयानंद पाईकराव | Updated: November 25, 2023 15:35 IST2023-11-25T15:34:15+5:302023-11-25T15:35:43+5:30
आरोपीस अटक : लग्नाचा विषय काढताच टाळाटाळ करून केले हात वर

घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार
नागपूर : घटस्फोट झालेल्या ३० वर्षाच्या महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तीन वर्ष तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीस अजनी पोलिसांनी अटक केली आहे.
मोहित सुरेंद्र शाहु (वय २९, रा. श्रीहरीनगर, बेसा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३० वर्षीय महिला घटस्फोटित आहे. ती कॅटरिंगचे काम करतो. मैत्रीणीच्या माध्यमातून तिची आरोपी मोहितसोबत ओळख झाली. मोहितने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
१५ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान आरोपी मोहितने तिला अजनी पोेलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुकानात, हॉटेल व तिच्या मानकापूर येथील घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर आरोपी मोहितने टाळाटाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अजनी पोलिसांनी आरोपी मोहितविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.