घराबाहेर हाकललेल्या पतीचा घटस्फोट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:48+5:302021-02-08T04:07:48+5:30

नागपूर : पत्नीने घराबाहेर हाकलून लावलेल्या पतीला कुटुंब न्यायालयातून मिळालेला घटस्फोट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. पत्नी ...

Divorced husband's divorce annulled | घराबाहेर हाकललेल्या पतीचा घटस्फोट रद्द

घराबाहेर हाकललेल्या पतीचा घटस्फोट रद्द

नागपूर : पत्नीने घराबाहेर हाकलून लावलेल्या पतीला कुटुंब न्यायालयातून मिळालेला घटस्फोट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला. पत्नी लग्नसंबंध तोडण्याच्या उद्देशाने पतीपासून विभक्त राहत असल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. परिणामी, पतीला हा दणका बसला.

नागपूर येथील शोभा व माधव (बदललेली नावे) यांचे ६ मे १९८३ रोजी लग्न झाले असून त्यांना तीन अपत्ये आहेत. शोभाने १२ जानेवारी २०११ रोजी माधवला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून तो भाड्याच्या घरात राहत आहे. दरम्यान, त्याने शोभाची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट मिळवण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी कुटुंब न्यायालयाने शोभा दोन वर्षांवर काळापासून विभक्त राहत असल्याच्या कारणावरून माधवला घटस्फोट मंजूर केला होता. त्या निर्णयाविरुद्ध शोभाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी अंतिम सुनावणीनंतर ते अपील मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

Web Title: Divorced husband's divorce annulled