शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महोत्सवाचे विघ्न टळले

By admin | Updated: January 22, 2015 02:38 IST

नागपूर महोत्सवावर विघ्न आणणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा महोत्सव होणार की नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती.

नागपूर : नागपूर महोत्सवावर विघ्न आणणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर हा महोत्सव होणार की नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण न्यायालयाने या याचिकेवर महापालिकेला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महोत्सव रद्द करण्यासाठी अंतरिम आदेश न्यायालयाने न दिल्याने तूर्तास नागपूर महोत्सवाचे विघ्न टळले आहे. गुरुवारी या महोत्सवाला थाटात प्रारंभ करण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्षी या महोत्सवात स्थानिक कलावंतांना स्थान देण्यात येत आहे. यंदा शैलेश दाणी आणि एम. ए. कादर यांनी स्थानिक कलावंतांचे संयोजन केले आहे, असे पत्रकार परिषदेत मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांनी सांगितले. नागपूर महोत्सवाचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजता यशवंत स्टेडियम, धंतोली येथे करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. २३ जानेवारी रोजी नागपूर सिटी स्टार्स या कार्यक्रमात स्थानिक कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. २४ जानेवारी रोजी रवी चारी, राकेश चौरसिया, नितीन शंकर, संगीत हल्दीपूर आणि शेल्डन व ग्रुपचे नादब्रह्म फ्युजन होईल. २५ जानेवारी रोजी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात हरी ओम पवार, प्रदीप चौबे, सुनीलजोगी, राजा धर्माधिकारी, पॉपुलर मेरठी आणि रश्मी किरण यांचा सहभाग आहे. तर २६ जानेवारी रोजी सुखविंदर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात सांस्कृतिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती नरेंद्र बोरकर यांनी दिली. याप्रासंगी पत्रकार परिषदेला प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे, संदीप जोशी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, अ‍ॅडमार्क इव्हेण्टसचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.