शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
4
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
5
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
6
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
7
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
8
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
9
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
10
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
11
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
13
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
14
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
15
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
16
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
17
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
18
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
19
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
20
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय व्हावे

By admin | Updated: November 24, 2014 01:16 IST

नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल

न्या. भूषण गवई : कळमेश्वर येथे नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ
कळमेश्वर : नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या, न्यायालयातील गर्दी व खेड्यापाड्यातील पक्षकारांना पडणारा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरऐवजी कळमेश्वर, सावनेर, काटोल व नरखेड या चार तालुक्यांसाठी जिल्हा सत्र न्यायालय स्थापन व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
कळमेश्वर येथील दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती किशोर सोनवणे, आ. सुनील केदार, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत ताजने, प्रबंधक राजेंद्रकर, कळमेश्वरचे न्यायाधीश विकास कारमोरे, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे, न्या. बेदरकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी नगर परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे कुमकुम तिलक करून स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले.
अ‍ॅड. सागर कऊटकर यांनी प्रास्ताविकात कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड हे तालुके मिळून कळमेश्वर येथे विभागीय जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी केली.
याप्रसंगी न्या. किशोर सोनवणे यांनी आपल्या भाषणात नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ होत असल्याने नागरिकांची गैरसोय संपणार आहे. या नवीन इमारतीसाठी तीन कोटी २१ लाख रुपये निधीतून नियोजित इमारत सहा महिन्यात बांधकाम विभाग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुनील केदार, अ‍ॅड. ताजने यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जिल्हा सत्र न्यायमूर्तीसह कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, हिंगणा, उमरेड, रामटेक, कामठी न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपविभागीय पोलीस अधिकारी मोरेश्वर आत्राम, पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, तहसीलदार, मुख्याधिकारी, विविध विभागातील अधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विधी कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. युवराज बागडे यांनी तर उपस्थितांचे आभार न्या. विकास कारमोरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)