शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयासाठी अतिरिक्त ५० कोटी

By admin | Updated: April 9, 2016 03:13 IST

नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणखी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा : ‘जस्टिसिया’ स्नेहमिलन कार्यक्रमाचे उद््घाटननागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी आणखी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.नागपूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने देशपांडे सभागृहात आयोजित ‘जस्टिसिया’ या तीन दिवसीय स्नेहमिलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई होते. बावनकुळे म्हणाले की, यापूर्वी या इमारतीसाठी ९१ कोटी रुपये मंजूर केले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. ही इमारत जिल्हा बार असोसिएशनच्या पाच पदाधिकाऱ्याच्या देखरेखीत निर्माण होईल. अतिरिक्त ५० कोटीं रुपये खर्च करण्यासाठी योजना तयार केली जात असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. जिल्हा बार असोसिएशनच्या स्थापनेला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या असोसिएशनने देशाला खूप काही दिले आहे. कर्तृत्ववान लोक आपल्यातून तयार झाले आहेत. मुख्यमंत्री झालेले डीबीएचे सदस्य देवेंद्र फडणवीस आज १८ तास काम करतात, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी केले. वसंत साठे यांनी दिल्ली येथील भेटी दरम्यान सांगितलेल्या माहितीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, १९४२ चे स्वातंत्र्य आंदोलन सुरू असताना तरुण वकील मंडळी जत्थ्याने व्हेरायटी चौकातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात आली होती. त्यावेळी सत्र न्यायालयाचे कामकाज दगडी इमारतीमध्ये चालत होते. या वकिलांनी चक्क दगडी इमारतीवर चढून तेथील ‘युनियन जॅक’ काढून तिरंगा फडकावला होता. प्रारंभी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अविनाश गुप्ता, अ‍ॅड. एस. के. मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कार्यकारी महाधिवक्ता रोहित देव, कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड. उदय डबले होते. या कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. राधिका जयस्वाल आणि अ‍ॅड. सचिन नारळे यांनी केले तर डीबीएचे सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी न्या. प्रसन्ना वराळे, न्या. एस. बी. शुक्रे, न्या. झेड. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर,न्या. स्वप्ना जोशी, अ‍ॅड. राजाभाऊ देशपांडे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे आसिफ कुरेशी, अनिल गोवारदीपे उपस्थित होते. (प्रतिनिधी)