सहजयोग परिवाराकडून राष्ट्रसंतांच्या भजनाचे विकृतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:27+5:302021-04-07T04:08:27+5:30

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ‘आया हूँ दरबार तुम्हारे’ हे प्रसिद्ध भजन निर्मलादेवी निर्मित सहजयोग या संस्थेने विकृत करून ...

Distortion of Rashtrasant's hymns by Sahajayoga family | सहजयोग परिवाराकडून राष्ट्रसंतांच्या भजनाचे विकृतीकरण

सहजयोग परिवाराकडून राष्ट्रसंतांच्या भजनाचे विकृतीकरण

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ‘आया हूँ दरबार तुम्हारे’ हे प्रसिद्ध भजन निर्मलादेवी निर्मित सहजयोग या संस्थेने विकृत करून धाकडे यांच्या आवाजात प्रसारित केल्याचा आरोप श्रीगुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केला आहे. या प्रकरणी सहजयोग परिवाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जाहीर माफी मागून त्या गीताचे प्रसारण महाराजांच्या शब्दातच करावे, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही साहित्यिकाच्या साहित्याची चोरी आणि विकृतीकरण हा गुन्हा आहे. राष्ट्रसंतांच्या भजनाबाबतही हेच घडले आहे. यापूर्वी २००१ मध्ये लिरीकल कॅसेट कंपनीने अशाच प्रकारे राष्ट्रसंतांच्या एका भजनाचे विकृतीकरण केले होते. या विरोधात आवाज उठविल्यावर कंपनीच्या मालकावर कायदेशीर कारवाई झाली होती. नंतरही असे प्रकार काही परिवारांकडून घडले असता तक्रारीनंतर संबंधितांनी माफी मागून चुकीची दुरुस्ती केली होती. सहजयोग परिवारानेसुद्धा ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी रक्षक यांनी केली आहे.

Web Title: Distortion of Rashtrasant's hymns by Sahajayoga family