शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य, विक्रेते व उत्पादकांचे आरोग्य संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:44 IST

विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देमनपाची कचरा उचलण्यात दिरंगाई : कचराघर तुडुंब भरले

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विदर्भातील पुष्प उत्पादक शेतकऱ्यांच्या सीताबर्डी भागातील महात्मा फुले पुष्प बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाचे दुर्लक्ष असल्याने कचराघर तुडुंब भरले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही बाब जीवघेणी असून मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी ठोक पुष्प विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना केली.लॉकडाऊनच्या काळात नेताजी मार्केटमधील फुल बाजार बंद होता. अनलॉकमध्ये सुरू झाल्यानंतर पुष्प उत्पादक शेतकरी फूल विक्रीसाठी आणत आहेत. सध्या सर्व फुलांची आवक वाढली, पण मंदिर, लग्नसमारंभ, वाढदिवस आणि विविध कार्यक्रम बंद असल्याने फुलांची विक्री कमी आहे. फुलांची विक्री न झाल्यानंतर उत्पादक माल तिथेच ठेवून निघूून जातात. अशा स्थितीत न विकलेली फुले कचराघरात फेकावी लागतात. ही नित्याचीच बाब झाली आहे. याशिवाय लगतचे दुकानदार आणि वस्तीतील लोक या ठिकाणी कचरा टाकतात. दरदिवशी कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. मनपाने कचरा दररोज उचलावा, अशी पुष्प विक्रेत्यांची मागणी आहे. पण त्याकडे मनपा कानाडोळा करीत असल्याचा आरोप महात्मा फुले पुष्प असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी केला.या बाजारात गोळा होणारा कचरा आणि सिमेंट रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यापाºयांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात येथे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचते. कचऱ्यामुळे डास व विषारी जीवजंतूचा प्रकोप वाढला आहे. ते आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी कुणीही पुढाकार घेत नाही. घाणीच्या वातावरणात व्यवसाय करणे कठीण झाले आहे. येथे गोळा होणारा कचरा दररोज उचलावा आणि आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामापासून मनपाने सुटका करावी, अशी मागणी रणनवरे यांनी केली आहे.बाजार शताब्दीनगरात हलवावानेताजी मार्केटमधील पुष्प बाजार शताब्दीनगरातील तीन एकरात हलवावा. मनपाने पुष्प बाजारासाठी ही जागा निश्चित केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण गाडी कुठे अडली हे कळायला मार्ग नाही. या संदर्भात २ एप्रिलला मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. शताब्दी बाजाराचा विकास विक्रेते करण्यास तयार आहे. पाच जिल्ह्याच्या मुख्य बाजारात सध्या ६४ अधिकृत विक्रेते कार्यरत आहे. शताब्दी नगरात बाजार नव्याने सुरू केल्यास नवीन विक्रेते पुन्हा जुळतील, शिवाय बाजाराचा व्यवसाय वाढेल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.शासनाने मदत करावीलॉकडाऊनमुळे शेकडो पुष्प उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. प्रत्येक उत्पादकाला लाखो रुपयांची फुले शेतातून फेकावी लागली. आताही विक्री नगण्यच आहे. त्यामुळे दररोज आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही, असे रणनवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर