शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसचा विकास

By admin | Updated: April 24, 2016 03:07 IST

नागपूर शहर व जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अपघात व प्रदूषणमुक्त नागपूर : नितीन गडकरी यांची माहिती नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अपघातप्रवण स्थळांच्या विकासासाठी ७.१० कोटी तर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांसाठी ७,१२५ कोटी रुपये देण्यात आले आहे, असेदेखील गडकरी यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचीदेखील त्यांनी माहिती दिली. नागपूरला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला असून शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. येत्या काळात ६०० ते ७०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते तयार करण्यात येणार आहेत. शिवाय ४३ किलोमीटरच्या रिंगरोडसाठी ‘सीआरएफ’कडून ४३४.१० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेदेखील गडकरी यांनी स्पष्ट केले.सोबतच नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी इथेनॉलवर चालणाऱ्या ५० बस, ‘बायोसीएनजी’वर चालणाऱ्या ५० बस, ‘बायोडिझेल’वर चालणाऱ्या ५ बस व बॅटरीवर चालणारी एक बस, अशा एकूण १०६ बसेस येणार आहेत. यातील ५० ‘ग्रीन बस’ महिन्याभरातच येतील, असा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारच्या बुद्धिस्ट वर्तुळाकार पर्यटन योजनेमध्ये नागपुरातील दीक्षाभूमी , चिचोली आणि ड्रॅगन पॅलेसचा अंतर्भाव करण्यात आला आहे , अशी माहिती त्यांनी दिली.‘ड्रॅगन पॅलेस’च्या विकासासाठीदेखील विशेष योजना तयार करण्यात येईल, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)‘मिहान’संदर्भात कडक पावले उचलणारनितीन गडकरी यांनी ‘मिहान’च्या कामाच्या गतीबाबत पूर्ण समाधानी नसल्याचे स्पष्ट केले. ‘मिहान’ची ज्या वेगाने प्रगती व्हायला हवी होती, तशी झालेली नाही. यासाठी अधिकारी जबाबदार असून सरकारी यंत्रणेला धापवळ करण्याची सवय नाही. अशा स्थितीत आता कडक पावले उचलावीच लागतील, असे थेट बोल गडकरी यांनी सुनावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळापेक्षा मात्र ‘मिहान’मधील स्थिती बरीच सुधारली असल्याचा चिमटादेखील त्यांनी काढला.‘नासुप्र’मध्ये ‘ई-गव्हर्नन्स’वर भर हवायावेळी नितीन गडकरी यांनी ‘नासुप्र’वर (नागपूर सुधार प्रन्यास)टीका केली. ‘नासुप्र’ला चांगले काम करण्याची सवय नाही. तेथील कार्यप्रणालीत पारदर्शकता येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तेथे ‘ई-गव्हर्नन्स’वर भर दिला गेला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. येत्या ५० वर्षांसाठीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. सोबतच अविकसित ले आऊट्ससाठी २०० कोटी रुपये देण्यात आले आहे. शहरात नव्याने अनधिकृत ले आऊट्स तयार होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असेदेखील गडकरी म्हणाले.