शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

धर्मचक्र प्रवर्तन दिन; बौद्ध पद्धतीचा तो पहिला विवाह ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:11 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला.

ठळक मुद्देधम्मदीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी झाला सोहळामहास्थवीर चंद्रमणी यांनी लावले लग्न

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या परिवर्तनामुळेच अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले गेले. याच जोरावर १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने पहिला बौद्ध विवाह लावला, आणि शतकानुशतके बुरसटलेल्या चालीरीती, प्रथांना तिलांजली दिली. कुही तालुक्यातील वामनराव मोटघरे व लष्करीबाग येथील दमयंती रामटेके या नवदाम्पत्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर एक नवी चेतना निर्माण झाली. जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसात भेद करतो, त्या धर्माच्या चालीरीतीने विवाह करायचा नाही असे ठरले. यासाठी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले नामदेवराव नागदेवते, पुंडलिक गौरखेडे, श्रीराम रामटेके यांनी वामनराव मोटघरे व दमयंती रामटेके यांचा विवाह बौद्ध पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. विवाहाची तारीखही जाणीवपूर्वक निवडण्यात आली. पहिल्यांदाच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायचित्र असलेल्या पत्रिका वाटण्यात आल्या. बाबासाहेबांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे यासाठी नागदेवते, गौरखेडे, रामटेके हे १३ आॅक्टोबर रोजी बर्डीच्या श्याम हॉटेलकडे निघाले. परंतु त्यांना बाहेरच थांबविण्यात आले. बºयाच प्रयत्नानंतर ते माईसाहेब आंबेडकरांना भेटू शकले. परंतु बाबासाहेबांची प्रकृती बरोबर नसल्याचा निरोप मिळाल्यावर ते माघारी फिरले. या विवाह सोहळ्यासाठी महास्थवीर चंद्रमणी यांनी होकार दिला होता. १४ आॅक्टोबरला या दोन्ही कुटुंबीयांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विवाहाचा दिवस १५ आॅक्टोबर आला. वधू-वर पांढरे शुभ्र वस्त्र घालून उभे होते. महास्थवीर चंद्रमणी यांनी या उभय वर-वधूला समोरासमोर उभे केले. त्रिशरण-पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या मंगल परिणयाला ४० हजाराहून लोक उपस्थित होते. आज हे दाम्पत्य नाही. त्यांचा मुलगा राजरतन मोटघरे हा विवाह सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत जिवंत करून सांगतात.बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणला विवाहप्रा. एन. एम. कांबळे आणि इंदुमती सदाशिवराव बंदीसोडे यांच्या विवाहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेबांनी विवाह समारंभासाठी स्वत: पाली गाथा लिहून दिल्या. १३ मे १९५६ रोजी हा मंगलसोहळा पार पाडला. बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणलेला भारतातील तो पहिलाच विवाह होता.

टॅग्स :DasaraदसराDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी