शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाची वेदना मांडणारे नाट्य रंगले

By admin | Updated: July 17, 2014 01:07 IST

भाग्यश्री क्रिएशन्स आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने हिंदी मोरभवन येथे रवी वाडकर लिखित आणि गिरीश पांडे दिग्दर्शित ‘मानसा परिस मेंढरं बरी’ या दीर्घांकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

‘मानसा परिस मेंढरं बरी’चा नाट्यप्रयोग : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सादरीकरण नागपूर : भाग्यश्री क्रिएशन्स आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने हिंदी मोरभवन येथे रवी वाडकर लिखित आणि गिरीश पांडे दिग्दर्शित ‘मानसा परिस मेंढरं बरी’ या दीर्घांकाचा प्रयोग सादर करण्यात आला. लोकनाट्याच्या स्वरूपात सादर करण्यात आलेल्या या नाट्यात धनगर जमातीचे दु:ख आणि वेदना प्रभावीपणे साकारण्यात आली. लोकनाट्याचा बाज असल्याने यात लोकसंगीत, लोकनृत्य, जुनी परंपरा, संस्कृती यांचा अभ्यासपूर्ण समावेश असल्याने नाटकाद्वारे एक संदेश रसिकांपर्यंत पोहोचविण्यात हा प्रयोग यशस्वी ठरला. धनगर जमातीला आजही राजाश्रय आणि लोकाश्रय नाही. त्यांचे आयुष्य माळरानावरच जाते. काही प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला आणि समाजातील मुले शिकून नोकरीवर लागली. पण ती आपली संस्कृती आणि परंपराच विसरलीत. कालौघात आपल्या परंपरेचे विस्मरण होऊ नये म्हणून धनगर समाजाचा संघर्ष सुरू आहे. याच आशयावर हे नाट्य बेतले आहे. माळरानावर गुरे चारणाऱ्या धनगराचा मुलगा शिकून शहरात जातो. माळरानावार राहणाऱ्या बापाला मात्र शहरात मुलाकडे आश्रयाला जायचे नसते. मुलाचा मात्र माळरान, गुरे चारणे या बाबींना विरोध असतो.माणसाशी माणसारखे संवेदनशीलतेने जगण्याची मजा गावातच त्याला वाटते. नात्यांमधल्या अंतर्विरोधातून परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या या दीर्घांकाचे दिग्दर्शन गिरीश पांडे यांनी कौशल्याने केले आहे. निर्मिती सूत्रधार, नेपथ्य अमोल निंबर्ते. प्रकाशयोजना संदीप डाबेराव यांची होती. यातील नृत्य स्वप्नील भरणे, वेशभूषा मनीष देव, सूत्रसंचालन मोहन काळबांडे, संगीत अश्विन महल्ले, रंगभूषा सचिन सातफळे यांची होती. या सर्व नव्या कलावंतांना रंगमंच मिळवून देण्याचे कार्य संजीवनी चौधरी यांनी केले. नाटकात प्रशांत खडसे, बिस्मार्क भिवगडे, रोहित घांगरेकर, रिकेशकुमार, अंकित कुसरे, ओंकार देव, स्वप्नील भरणे, अपूर्व नेरकर, गौरव घरोटे, श्रीकांत सोनटक्के, हर्षद मानकर, कौस्तुभ वंदे, नितीन शिंगणे, प्रज्ञेश बेगडे आणि स्नेहा अहेर, प्रीती बुधकोंडवार यांनी भूमिका केली. याप्रसंगी शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष धर्मदास भिवगडे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. (प्रतिनिधी)